जि.प. अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीची सेनेला हाक!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2017 12:51 AM2017-03-20T00:51:31+5:302017-03-20T00:51:31+5:30
काँग्रेसची आज गटनोंदणी : भाजपेतर पक्ष एकवटले
जळगाव : जिल्हा परिषद अध्यक्षपदाची निवडणूक एका दिवसावर येऊन ठेपली असताना भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेला प्रस्ताव दिला आहे. शिवसेनेच्या सोमवारच्या बैठकीत राष्ट्रवादीच्या पाठिंब्याबाबत अंतिम निर्णय होईल. तर काँग्रेस जिल्हाध्यक्षांनी गटनोंदणीसाठी जि.प. सदस्यांना कायदेशीर नोटीस बजावली आहे.
जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष निवड मंगळवार, २१ रोजी होत आहे. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष डॉ.सतीश पाटील यांनी सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांना प्रस्ताव दिला आहे. भाजपा युतीबाबत काहीच बोलायला तयार नसल्याने शिवसेनेनेदेखील राष्ट्रवादीच्या प्रस्तावावर चर्चा सुरू केल्याचे गुलाबराव पाटील यांनी सांगितले.
जि.प.सदस्य गटनोंदणीला वारंवार गैरहजर राहणाºया किनगाव-डांभुर्णी गटाच्या जि.प.सदस्या अरुणा रामदास पाटील यांच्यासह चारही सदस्यांना सोमवारी होणाºया गटनोंदणीसाठी उपस्थित रहावे या आशयाची कायदेशीर नोटीस काँग्रेस जिल्हाध्यक्षांनी काढली आहे. अरुणा पाटील यांनी यापूर्वी दिलेली नोटीस न स्वीकारल्याने त्यांना रजिस्टर पोस्टाने नोटीस पाठविण्यात आली आहे.
काँगे्रसचे जिल्हा प्रभारी विनायक देशमुख यांच्या उपस्थितीत सोमवारी बैठक होत आहे. या बैठकीत जि.प. अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडणुकीतील काँग्रेसच्या भूमिकेबाबत निर्णय होणार आहे. राष्टÑवादीला कुणी पाठिंबा दिला अथवा नाही दिला तरी राष्टÑवादी काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढणार आहे.