जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिका:यांना नोटीस

By admin | Published: March 17, 2017 12:25 AM2017-03-17T00:25:17+5:302017-03-17T00:25:17+5:30

भोरटेक : शाळेची भिंत कोसळून सात महिने उलटले तरी विद्याथ्र्यास मदत मिळेना

Zip Notice to Chief Executive Officer and Education Officer | जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिका:यांना नोटीस

जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिका:यांना नोटीस

Next

कजगाव, ता. भडगाव : भोरटेक  येथे गेल्या वर्षी शाळेची भिंत कोसळून विद्यार्थी जखमी  झाला होता,  मात्र 7 महिने उलटूनही अद्याप या विद्याथ्र्यास वैद्यकीय खर्च मिळत नसल्याने  भोरटेक येथील सरपंच व विद्याथ्र्याच्या  पालकाने जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी                         (जळगाव) यांना वकिलामार्फत नोटीस पाठवून 30 दिवसात नुकसान भरपाई द्यावी अन्यथा न्यायालयात याचिका दाखल करण्यात येईल, असे सूचित केले आहे.
  भोरटेक येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेची भिंत 27 जुलै 2016 रोजी  कोसळली होती. यात 4 थी चा विद्यार्थी जखमी झाला होता.  त्याच्या मांडीचे हाड मोडल्याने त्यास चाळीसगावी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. जखमी विद्यार्थी आनंदा धर्मा भिल याची दवाखान्याचे बिल भरण्याची परिस्थिती नसल्याने त्यास मदत देण्याची मागणी करण्यात आली होती. या मागणीचा पाठपुरावा सातत्याने सुरू होता. मात्र या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आले. या दुर्घटनेनंतर लोकप्रतिनिधी  व अधिका:यांनी  घटनास्थळी भेटी दिल्या व मदतीचे आश्वासन देण्यात आले होते, मात्र अंमलबजावणी अद्यापपयर्ंत झालेली नाही.
ना शाळा दुरुस्ती, ना विद्याथ्र्यास मदत
गेल्या 7 महिन्यात कोणतीही हालचाल शासन दरबारी होत नसल्यामुळे                   ना शाळा दुरुस्ती होत आहे ना विद्याथ्र्यास मदत मिळत आहे.  यामुळे शेवटी त्रासून भोरटेकचे सरपंच तुकाराम जाधव व विद्याथ्र्याचे पालक धर्मा भिल यांनी नोटीस पाठवून  शारीरिक नुकसान भरपाई 60 हजार रुपये तर आर्थिक नुकसान भरपाई 50 हजार रुपये, मानसिक नुकसानीपोटी 20 हजार रुपये व पुढील भविष्यासाठी 50 हजार रुपये अशी भरपाई  न मिळाल्याने तसेच शाळेच्या इमारतीत कोणतीही सुधारणा केलेली नाही आदी  कारणांमुळे वकिलामार्फत नोटीस पाठविण्यात आली आहे. याप्रकरणी दखल घ्यावी, अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.

Web Title: Zip Notice to Chief Executive Officer and Education Officer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.