झिपरू अण्णा महाराज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:14 AM2021-05-28T04:14:15+5:302021-05-28T04:14:15+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नशिराबाद : येथील ग्रामदैवत व देशी-विदेशी लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या प.पू. संत झिपरू अण्णा महाराज पुण्यतिथी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नशिराबाद : येथील ग्रामदैवत व देशी-विदेशी लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या प.पू. संत झिपरू अण्णा महाराज पुण्यतिथी यात्रोत्सवास वेदमंत्रोच्चारात अभिषेक पूजन करून ध्वजपताका उभारून यात्रोत्सवास साधेपणाने प्रारंभ करण्यात आला. ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सुरुवात करण्यात आली आहे. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लाॅकडाऊनमुळे कथा, कीर्तने आदी सर्व कार्यक्रम रद्द करून शासनाची सर्व नियमावली पाळत उत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्यात येत आहे.
उत्सवाची परंपरा खंडित होऊ नये यासाठी शासनाचे नियम पाळत श्रींच्या उत्सवाला साधेपणाने सुरुवात करण्यात आली. गुरुवारी सकाळी मंगलमय भद्रसूक्त पाठ करून कार्यक्रमास आरंभ झाला. श्रींच्या मूर्तीस महाभिषेक झाला. स्मारक समितीचे संचालक सुधीर मोहरीर, पुजारी जयंत गुरव यांच्या हस्ते पूजन झाले. सुपाशेठ सदाफळे ज्ञानेश्वरी पारायण वाचन करीत आहेत. वैशाख वद्य नवमी म्हणजे श्रींचा पुण्यतिथी दिवस आहे. यंदा ३ जून रोजी श्रींच्या पुण्यतिथीनिमित्त पहाटे श्रींच्या मूर्तीस अभिषेक पूजन व पादुकांची मंदिरातील गाभाऱ्यात प्रदक्षिणा करून जागेवर स्थापना पूजन होईल.