पेन्शन फाईल रोखणारा जि.प.तील लिपिक निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2019 11:56 AM2019-04-10T11:56:12+5:302019-04-10T11:57:10+5:30
वारंवार त्रुटी काढून सेवानिवृत्त कर्मचाऱ्याची पेन्शन फाईल रोखली
जळगाव : वारंवार त्रुटी काढून सेवानिवृत्त कर्मचाऱ्याची पेन्शन फाईल रोखणाऱ्या जिल्हा परिषद आरोग्य विभागातील वरिष्ठ सहाय्यक राजेंद्र धनगर याला निलंबित करण्यात आले आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ़ बी़एऩ पाटील यांनी मंगळवारी ही कारवाई केली़ यामुळे प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे़
जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांना शिस्त लागावी व कामात नियमितता यावी, यासाठी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ़बी़एऩपाटील हे त्यांच्या पथकासह अचानक कुठल्याही वेळी कुठल्याही विभागात अचानक भेट देतात़ यात कुणी कर्मचारी गैरहजर किंवा उशिरा आढळून आल्यास त्यांच्या कार्यवाहीचा बडगा उगारण्यात येतो़ गेल्या काही दिवसांपासून एक वृध्द व्यक्ती आरोग्य विभागात पेन्शन फाईन असल्यामुळे चकरा मारीत होते़ अनेकवेळा त्रुटी काढून वरिष्ठ सहाय्यक राजेंद्र धनगर हे पेन्शन फाईल रोखत होते. दरम्यान, यापूर्वी देखील धनगर यांच्याबाबत अनेक तक्रारी मुख्य कार्यकारी अधिकाºयांना प्राप्त झाल्या होत्या़ मंगळवारी देखील सेवानिवृत्त कर्मचारी आरोग्य विभागात आल्यानंतर देखील धनगर यांच्याकडून फाईल रोखून ठेवण्यात आली़ अखेर त्या वृध्दाने मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट घेऊन संपूर्ण प्रकाराची माहिती दिली़ मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आधी प्राप्त झालेल्या तक्रारी आणि फाईल रोखून ठेवल्याच्या प्रकाराची तात्काळ दखल घेऊन राजेंद्र धनगर यांच्यावर निलंबनाची कार्यवाही केली़