जि.प. कार्यकाळ एक वर्षासाठी वाढविण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:22 AM2021-08-24T04:22:06+5:302021-08-24T04:22:06+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोनामुळे जनतेशी संपर्क होऊ न शकल्याने जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या कार्यकाळ हा एक ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोनामुळे जनतेशी संपर्क होऊ न शकल्याने जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या कार्यकाळ हा एक वर्षासाठी वाढविण्यात यावा, अशी मागणी जि. प. व पं. स. सदस्य असोसिएशकडून करण्यात आली आहे. यासह विविध मागण्यांचे संघटनेकडून जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना निवेदन देण्यात आले.
यात ८ मागण्या मांडण्यात आल्या आहेत. यावेळी जि.प. अध्यक्षा रंजना पाटील, उपाध्यक्ष लालचंद पाटील, सदस्य प्रभाकर सोनवणे, नानाभाऊ महाजन, अमित देशमुख, रावसाहेब पाटील, गजेंद्र सोनवणे, डॉ. हर्षल माने, पवन सोनवणे, रवींद्र पाटील आदी उपस्थित होते.
या आहेत मागण्या
स्थानिक स्वराज्य संस्थेचा आमदार हा स्थानिक स्वराज्य संस्थेचा मतदार असावा, कोविड १९ चा दीड वर्षापासून प्रादुर्भाव असल्यामुळे ग्रामीण भागातील जनतेशी संवाद होऊ शकलेला नाही. त्यामुळे जि.प.व पं.स. यांचा कार्यकाळ वर्षभरासाठी वाढविण्यात यावा, सदस्यांचे राजकीय आरक्षण १० वर्षांसाठी कायम असावे, कुशल सदस्यांची नियुक्ती करावी, ७३ व ७४ ही घटना दुरुस्ती राज्यात लागू करावी, पूर्वीप्रमाणे असणारे बदली अधिकार मिळावे, पंचायत समिती सदस्यांना विधान परिषदेसाठी मतदानाचा अधिकार असवा, जि.प. सदस्यांना किमान २० हजार व पंचायत समिती सदस्यांना किमान १० हजार मानधन असावे.