जि़.प. त विज्ञान केंद्राच्या निविदेवरून सत्ताधारीच भिडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2020 12:04 PM2020-03-04T12:04:14+5:302020-03-04T12:04:27+5:30

सभा तापली : माजी उपाध्यक्ष म्हणतात प्रक्रिया नव्याने राबवा, माजी सभापतींची निविदा कायम ठेवण्याची मागणी

 ZP The ruling center was overwhelmed by the tender of the science center | जि़.प. त विज्ञान केंद्राच्या निविदेवरून सत्ताधारीच भिडले

जि़.प. त विज्ञान केंद्राच्या निविदेवरून सत्ताधारीच भिडले

googlenewsNext

जळगाव : गेल्या काही सभांमध्ये सातत्याने वादग्रस्त ठरत असलेल्या विज्ञान केंद्राच्या अडीच कोटी रूपयांच्या निविदेवरून जिल्हा परिषदेच्या सर्वसाधरण सभेतही सत्ताधाऱ्यांमध्येच जोरदार खडाजंगी झाली़ ही प्रक्रियाच बेकायदेशीर असल्याचा आरोप करीत ती नव्याने राबवावी अशी मागणी माजी उपाध्यक्षांसह अनेक सदस्यांनी लावून धरली तर हा विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी आवश्यक विषय असल्याचे सांगत ती कायम ठेवावी, अशी मागणी माजी सभापती पोपट भोळे यांनी केली़ या गोंधळानंतर याबाबचा निर्णय स्थगित ठेवण्यात आल्याचे सीईओ डॉ़ बी़ एऩ पाटील यांनी सांगितले़
जिल्हा परिषदेची सर्वसाधरण सभा अध्यक्षा रंजना पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी दुपारी २ ते ५ वाजेपर्यंत झाली़ उपाध्यक्ष लालचंद पाटील, शिक्षण, आरोग्य सभापती रवींद्र पाटील, समाजकल्याण सभापती जयपाल बोदडे, महिला व बालविकास सभापती ज्योती पाटील, कृषी व पशूसंवर्धन सभापती उज्ज्वला माळके, सीईओ डॉ़ बी़ एऩ पाटील, अतिरिक्त सीईओ विनोद गायकवाड, डेप्युटी सीईओ के़ बी़ रणदिवे आदी व्यासपीठावर उपस्थित होते़
विषयांआधी वादाला सुरूवात
सभा सुरू होताच मानव विकासच्या निधीतून सात तालुक्यांमध्ये सुरू करण्यात येत असलेल्या विज्ञान केंद्रा बाबतच्या निविदांवरून गोंधळास सुरूवात झाली़ कोट्यवधींच्या कामाच्या निविदा या कुणालाही कल्पना न देता प्रसिद्ध होतात, असा मुद्दा मधुकर काटे यांनी मांडला यावर रावसाहेब पाटील, माजी उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन यांनीही ही निविदा प्रक्रियाच बेकायदेशी असल्याचे सांगत त्यात इस्टीेमेटच जोडलेले नसल्याचा मुद्दा मांडला़ पोपट भोळे यांनी यात प्रत्यूत्तर देण्याचा प्रयत्न करीत असताना मोठा गोंधळ उडाला बराच वेळ हा गोंधळ सुरू होता़ निविदा प्रक्रिया रद्द करण्याच्या मागणीसाठी सत्ताधारी व काही विरोधी सदस्य आक्रमक भूमिका मांडत होते़ ही प्रक्रिया रद्दच करा, असा पवित्रा त्यांनी घेतला होता़ अखेर तपासणी करून हा निर्णय स्थगित ठेवण्याच्या सूचना सीईओंनी दिल्या़ दरम्यान, पाणीपट्टी वसुलीचा मुद्दाही गाजला जिल्हाभरात जानेवारी अखेरपर्यंत ५५ टक्के वसुली झाली असल्याचे अधिकारी बोटे यांनी सांगितले़ यावर ही कागदोपत्री वसुली असून मार्च पर्यंत बरोबर ८० टक्क्यांपर्यंत जाईल, असा टोला सदस्यांनी लगावला़ दरमहिन्याला वसुलीचा आढावा घेऊन एकूण वसुलीपैकी २० टक्के जिल्हा परिषदेत दरमहिन्याला जमा करावी, असे नियोजन करण्याच्या सूचना सीईओ डॉ़ पाटील यांनी दिली़
६९ कोटींची कामे कोणासामेर आली? - भोळे
आपण सभापती असताना िविज्ञान केंद्राबाबत विषय झाला़ सर्व प्रक्रिया नियमानुसारच झाल्याचे स्पष्टीकरण पोपट भोळे यांनी दिले़ या विषयाला विरोध होतो, तर किती कामे सभेसमोर येतात़ ६९ कोटींची कामे सुरू असताना ती कोणत्या सभेसमोर आली़ असा सवाल त्यांनी उपस्थित केला़ यावर तुम्ही तक्रार करा असा सल्ला नंदकिशोर महाजन यांनी दिला़ या मुद्दयावूरन भोळे विरूद्ध सत्ताधारी असे चित्र निर्माण होते़ प्रभाकर सोनवणे, यांनीही आक्षेप नोंदविला़
विरोधकांचे विषय दाबले जातात
रिंगणगाव आरोग्य केंद्राच्या निर्लेखनाच्या विषयावरून सदस्य नानाभाऊ महाजन यांनी मांडला़ अध्यक्षांनी स्वाक्षरी करण्यास नकार दिला या अधिकाऱ्यांच्या उत्तरावरून त्यांनी नाराजी व्यक्त केली़ विकास कामांना विरोध होत असेल तर हे गंभीर असल्याचे ते म्हणाले़ विरोधकांचे विषय मुद्दामहून दाबून ठेवले जातात, असा आरोप त्यांनी केला़

वाद अन् सदस्यांची मध्यस्थी
सदस्य गोपाल चौधरी व नंदकिशोर महाजन यांच्यातही जोरदार खडाजंगी झाली़ वसुली होत नसल्याने याला सदस्यही जबाबदार असल्याचा मुद्दा चौधरी यांनी मांडला़ यावर महाजन यांनी आक्षेप नोंदविला़ ‘आता तुम्ही खाली आहात, विषय मध्येच थांबविणे चालणार नाही, असे सांगत चौधरींनी महाजन यांना थांबविण्याचा प्रयत्न केला़ यानंतर जोरदार वाद झाले व अन्य सदस्यांनी मध्यस्थी करीत हा वाद मिटविला़

Web Title:  ZP The ruling center was overwhelmed by the tender of the science center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.