दज्रेदार शिक्षणासाठी सरसावले माजी विद्यार्थी; कल्याणे खुर्द जि.प. शाळेचे पालटतेय चित्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2018 12:58 PM2018-05-14T12:58:05+5:302018-05-14T12:58:05+5:30

टी.व्ही. संच भेट

Zp school's changing image | दज्रेदार शिक्षणासाठी सरसावले माजी विद्यार्थी; कल्याणे खुर्द जि.प. शाळेचे पालटतेय चित्र

दज्रेदार शिक्षणासाठी सरसावले माजी विद्यार्थी; कल्याणे खुर्द जि.प. शाळेचे पालटतेय चित्र

Next
ठळक मुद्देलवकरच रंगरंगोटी करणार24 हजार रुपये केले गोळा

विकास पाटील / ऑनलाइन लोकमत
जळगाव, दि. 14 -  धरणगाव तालुक्यातील कल्याणे खुर्द येथील जिल्हा परिषद शाळेच्या माजी विद्याथ्र्यानी गावातील विद्याथ्र्याना गावातच दज्रेदार प्राथमिक शिक्षण मिळावे यासाठी विडा उचलला आहे. त्यासाठी 25 माजी विद्यार्थी एकवटले असून ग्रामस्थांच्या सहकार्याने जि.प. शाळेचे चित्र बदलू लागले आहे.
कल्याणे खुर्द हे सुमारे 2 हजार लोकवस्तीचे गाव. येथे पहिली ते चौथीर्पयत जिल्हा परिषदेची शाळा आहे. या शाळेने गावातील अनेक विद्याथ्र्याना इंजिनिअर, शिक्षक, पोलीस बनविले. मुंबई, पुणे यासह राज्यात अनेक ठिकाणी महत्त्वाच्या पदावर हे माजी विद्यार्थी कार्यरत आहेत. ज्या शाळेने आपल्याला दज्रेदार शिक्षण दिले. मोठय़ा पदार्पयत पोहचविले. त्या शाळेची दैना पाहून माजी विद्यार्थी नाराज झाले. 
सोशल मीडियावर चर्चा झाली अन् मदतीचे हात सरसावले
दज्रेदार शिक्षण मिळत नसल्याने गावातील विद्यार्थी एरंडोल, धरणगाव, पाळधी येथे शिक्षणासाठी ये-जा करू लागले. त्यामुळे जि.प. शाळेची पटसंख्या घसरली. ही बाब माजी विद्याथ्र्यानी सोशल मीडियावर बनविलेल्या ग्रुपवरून सर्व सदस्यांना समजली. अनेकांनी चिंता व्यक्त करीत आपण या शाळेसाठी काही तरी केले पाहिजे. शाळेला गतवैभव आपण मिळवून दिले पाहिजे, असे मत व्यक्त केले.
मुंबई येथे सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या अमोल राजपूत व शिक्षक विजय पाटील यांनी त्यासाठी पुढाकार घेतला. शाळेला डिजिटल करण्याचा एकमुखी निर्धार या 25 माजी विद्याथ्र्यानी सोशल मीडियावर केला. शाळेच्या मुख्याध्यापिका सपकाळे, सरपंच अनिता संदीप पाटील व ग्रामस्थांना या माजी विद्याथ्र्यानी गावात येऊन त्यांनी केलेल्या निर्धाराबाबत माहिती दिली. चांगल्या उपक्रमाला कुणीही नकार दिला नाही. शिक्षकांनाही विश्वासात घेतले. त्यांनीही शाळेचा दर्जा उंचावण्यासाठी प्रय} करण्याचा निश्चय केला.
24 हजार रुपये केले गोळा
माजी विद्याथ्र्यानी शाळेला सर्वप्रथम संगणक देण्याचे ठरविले. त्यासाठी आठवडाभरात 24 हजार रुपये गोळा झाले. मुख्याध्यापिकेशी चर्चा केली. संगणकाऐवजी टी.व्ही. मिळाल्यास विद्याथ्र्याना त्यावर मोठे चित्र पाहता येईल व ते फायदेशीर ठरेल अशी सूचना केली. त्यानुसार माजी विद्याथ्र्यानी 24 इंची टी.व्ही. शाळेला भेट दिला. एका माजी विद्याथ्र्याने पदराचे 9 हजार रुपये खर्च करून शाळेला साऊड सिस्टिम संच भेट दिला. 
विद्याथ्र्याना टॅब देण्याचा प्रय}
पुढील टप्प्यात आता शाळेची रंगरंगोटी करण्याचा निश्चय या भूमिपुत्रांनी केला आहे. त्यानंतर शाळेतील प्रत्येक विद्याथ्र्याला टॅब देण्याचे त्यांचे नियोजन आहे. हा टॅब शाळेत येणा:या प्रत्येकाला दिला जाईल. शाळेत असेर्पयत ते त्याचा वापर करू शकतील, अशी योजना आहे.

ज्या शाळेत आम्ही शिक्षण घेतले. मोठे झालो. त्या शाळेची दैना पाहून नाराज झालो. माजी विद्याथ्र्यापुढे शाळेचे चित्र बदलण्यासाठी प्रस्ताव ठेवला. सर्वानी मदतीचा हात दिला. हळूहळू शाळेचे चित्र बदलू लागले आहे. हे पाहून खूप आनंद होत आहे.
-अमोल राजपूत, सॉफ्टवेअर इंजिनिअर, मुंबई (माजी विद्यार्थी, कल्याणे खुर्दर्) 

Web Title: Zp school's changing image

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.