जि.प.शिक्षक पुरस्कार जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2017 09:32 PM2017-09-27T21:32:22+5:302017-09-27T22:29:01+5:30
जिल्हा परिषदेकडून देण्यात येणाºया शिक्षक पुरस्कारासाठी जिल्ह्यातील १५ शिक्षकांची नावे बुधवारी जाहीर करण्यात आली.
आॅनलाईन लोकमत
जळगाव, दि.२७-जिल्हा परिषदेकडून देण्यात येणाºया शिक्षक पुरस्कारासाठी जिल्ह्यातील १५ शिक्षकांची नावे बुधवारी जाहीर करण्यात आली. यावेळी जि.प.शिक्षण समिती सदस्य पोपटराव भोळे, प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी बी.जे.पाटील आदी उपस्थित होते.
गेल्या दोन वर्षांपासून जिल्हा परिषदेकडून शिक्षक दिनाच्या पार्श्वभूमीवर शाळांमध्ये विद्यार्थी हिताचे उपक्रम राबविणाºया १५ शिक्षकांना शिक्षक पुरस्कार देण्यात येत असतो. यावर्षी ५ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी असल्याने त्या दिवशी सुट्टी होती. त्यामुळे त्या पुरस्कारांचे वितरण होवू शकले नव्हते. २ आॅक्टोबर गांधी जयंतीनिमित्त या पुरस्कारांचे वितरण शहरातील कांताई सभागृहात होणार असून, यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, जि.प.मुख्यकार्यकारी अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, शिक्षण सभापती पोपटराव भोळे आदी उपस्थित राहणार आहेत. १५ शिक्षक पुरस्कारांसाठी जिल्ह्यातुन १८ शिक्षकांचे प्रस्ताव यंदा आले होते. २ सप्टेंबर रोजी शिक्षकांची मुलाखत घेण्यात आली होती. त्यातुन निवड झालेल्या शिक्षकांची यादी आयुक्त कार्यालयात पाठविण्यरात आली होती. अखेर बुधवारी ही नावे जाहीर करण्यात आली. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एका शिक्षकाची निवड या पुरस्कारासाठी करण्यात आली आहे.
शिक्षक पुरस्कारप्राप्त शिक्षकांची नावे
छगन पाटील (जवखेडे जि.प.शाळा, अमळनेर), अविनाश देवरे (पिंपरखेडे, भडगाव), रमेशसिंग पाटील (शिंदी, भुसावळ), रविंद्र गवळी (मनुर खु. बोदवड), प्रमोद बाविस्कर (चोपडा जि.प.शाळा), राजेंद्र वाघ (टाकळी प्र.चा., चाळीसगाव), दत्तात्रय पाटील (साकरे , धरणगाव), किशोर पाटील-कुंझरकर (भिल्लवस्ती गालापुर, एरंडोल), मनोहर खोंडे (आव्हाणे जि.प.शाळा, जळगाव), पद्माकर गिरनार (भराडी, जामनेर), मनवंतराव साळुंखे (धाबे, पारोळा), अरुण पाटील (बाळद बु.जि.प.शाळा, पाचोरा), तुळशिराम कोळपे (धुळे जि.प.शाळा, मुक्ताईनगर), शशिकला राणे (उटखेडा, रावेर), प्रतिभा जंगले (दहिगाव, यावल)