Instagram आणि TikTok वरुन महिन्याला 1 कोटींची कमाई, कोण आहे 'मिस एक्सल'?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2021 03:07 PM2021-12-23T15:07:59+5:302021-12-23T15:11:50+5:30

सध्याच्या सोशल मीडियाच्या जगात काहीजण दिवसभर स्क्रोल करुन वेळ वाया घालवत आहेत, तर दुसरीकडे काही युजर्स कंटेट बनवून लाखो-करोडो रुपये कमवत आहेत.

1 crore monthly income from Instagram and TikTok, who is 'Miss Excel'? | Instagram आणि TikTok वरुन महिन्याला 1 कोटींची कमाई, कोण आहे 'मिस एक्सल'?

Instagram आणि TikTok वरुन महिन्याला 1 कोटींची कमाई, कोण आहे 'मिस एक्सल'?

Next

आज सोशल मीडियावरून अनेकजण महिन्याला लाखो आणि करोडो रुपये कमावत आहेत. त्याचंच एक उदाहरण म्हणजे कॅट नॉर्टन (@miss.excel). होय, इंस्टाग्राम आणि टिक टॉकवर व्हिडिओ बनवून कॅट नॉर्टन महिन्याला करोडो रुपये कमावते. तुम्हाला वाटत असेल की, ही तरुणी करते काय ? तर, ही तरुणी इंस्टाग्राम आणि टिकटॉकवर मायक्रोसॉफ्ट एक्सेल शिकवते.

कॅट नॉर्टन (@miss.excel) Instagram आणि Tiktok वर तिच्या चाहत्यांना एमएस एक्सेल टिप्स आणि युक्त्या शिकवते. एका वर्षाच्या आत Instagram आणि TikTok वर तिने 1 मिलीयनहून अधिक फॉलोअर्स मिळवले आहेत. मिस एक्सेलने व्हिडिओ अपलोड करताच, तिच्या व्हिडिओवर चाहते तुटून पडतात. यातूनच ती महिन्याला सूमारे एक कोटी रुपयांची कमाई करते.

कोण आहे मिस एक्सेल ?
द एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, 27 वर्षीय कॅट नॉर्टनने मायक्रोसॉफ्ट एक्सेल ऑनलाइन शिकवण्यासाठी तिची कॉर्पोरेट नोकरी सोडली. यानंतर तिचे आयुष्य अक्षरशः बदलले आणि आता व्हिडिओ बनवून ती महिन्याला 1 कोटी रुपये कमवत आहे. एयासोबतच तिने लाखो लोकांना प्रशिक्षणही दिले आहे.

इंस्टाग्रामवर @miss.excel या नावाने प्रसिद्ध असलेल्या नॉर्टनने नोव्हेंबर 2020 मध्ये ऑनलाइन शिक्षण व्यवसाय सुरू केला होता. आता 1 दशलक्षाहून अधिक फॉलोअर्सना Excel च्या युक्त्या आणि टिप्स शेअर करुन ती करोडो रुपये कमवत आहेत. कॅट नॉर्टनच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर 5 लाख 70 हजार फॉलोअर्स आहेत. मायक्रोसॉफ्ट तिला या व्हिडिओंच्या बदल्यात पैसे देते. 
 

Read in English

Web Title: 1 crore monthly income from Instagram and TikTok, who is 'Miss Excel'?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.