१ कोटी पगार, केवळ ६-७ तास काम, तरीही या नोकरीसाठी अर्ज करण्यास कचरताहेत लोक, कारण काय? पाहा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2023 07:08 PM2023-06-13T19:08:40+5:302023-06-13T19:09:04+5:30

Jab: केवळ लाईटचा बल्ब बदलण्यासाठी एक कोटी रुपये पगाराची नोकरी. वाचून थोडं आश्चर्य वाटलं असेल. मात्र सध्या सोशल मीडियावर एक अशा नोकरीची जाहिरात ही चर्चेचा विषय ठरली आहे.

1 crore salary, only 6-7 hours work, still people hesitate to apply for this job, why? see | १ कोटी पगार, केवळ ६-७ तास काम, तरीही या नोकरीसाठी अर्ज करण्यास कचरताहेत लोक, कारण काय? पाहा

१ कोटी पगार, केवळ ६-७ तास काम, तरीही या नोकरीसाठी अर्ज करण्यास कचरताहेत लोक, कारण काय? पाहा

googlenewsNext

केवळ लाईटचा बल्ब बदलण्यासाठी एक कोटी रुपये पगाराची नोकरी. वाचून थोडं आश्चर्य वाटलं असेल. मात्र सध्या सोशल मीडियावर एक अशा नोकरीची जाहिरात ही चर्चेचा विषय ठरली आहे. मात्र एवढ्या लठ्ठ पगाराची ऑफर असूनही लोक या नोकरीसाठी अर्ज करण्यास कचरत आहेत. त्याचं कारण म्हणजे या कामामध्ये जोखीम भरपूर आहे. 

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या जाहिरातीनुसार ही नोकरी टॉवरवरील विजेचे दिवे बदलण्याची आहे. अमेरिकेतील साऊथ डेकोटा येथे या नोकरीसाठी जागा निघाल्या आहेत. यामध्ये तुम्हाला ६०० मीटरहून अधिक उंचीच्या सिग्नल टॉवरवर चढून त्यावरील बल्ब बदलावे लागतील.
हे टॉवर इतर सामान्य टॉवरपेक्षा थोडे वेगळे आहेत. तुम्ही त्यावर जेवढे उंचावर जाल तेवढे ते बारीक होत जातात. एवढ्या उंचावर पोहोचणं आणि तिथं उभं राहून बल्ब बदलणं हे आव्हानात्मक आहे. तसेच वर चढण्यासाठी सेफ्टी म्हणून केवळ सेफ्टी केबलचा वापर होतो. 

मिरर यूकेने दिलेल्या वृत्तानुसार या नोकरीमधील सर्वात आवश्यक असलेली अट म्हणजे नोकरीसाठी इच्छुक अर्जदाराला उंचीची भीती वाटता कामा नये. तो शारीरिक दृष्टा पूर्णपणे तंदुरुस्त असला पाहिजे. या नोकरीसाठी एक वर्षापेक्षा कमी अनुभव असलेले लोकही अर्ज करू शकतात. पगार हा अनुभवाच्या आधारावर निश्चित केला जाईल. मात्र सुरुवातीचा पगार हा सर्वसामान्य पगारापेक्षा खूप जास्त असेल.

जमिनीपासून ६०० मीटर उंच असलेल्या टॉवरवर चढण्यासाठी सुमारे तीन तास वेळ लागतो. तसेच वरून खाली उतरण्यासाठीही तेवढाच वेळ लागतो. म्हणजेच कामाची वेळ ६ ते ७ तास एवढी असेल. त्याशिवाय टॉवरच्या टॉपवर १०० किमी प्रतितास वेगाने वारे वाहतात. त्यामुळे जो या टॉवरवर उभा राहून बल्ब बदण्याचं काम करेल, त्याच्यासमोर आव्हान आणखीच कठीण बनते.

जी व्यक्ती हे काम करेल, त्याला सुमारे १००००० पौंड्स (सुमारे १ कोटी रुपये) वार्षिक पॅकेज मिळेल. प्रत्येक सहा महिन्यांमध्ये एक ते दोन वेळाच कुठल्याही टॉवरवरील बल्ब बदलावा लागतो. मात्र हे काम एकट्यानेच टॉवरवर चढून करावे लागणार आहे.  

Web Title: 1 crore salary, only 6-7 hours work, still people hesitate to apply for this job, why? see

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.