१० दिवसांआधीच सुटून आला, आता पुन्हा त्याने केली तरुंगात जाण्याची मागणी!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2018 03:54 PM2018-11-07T15:54:34+5:302018-11-07T15:55:24+5:30
जगात चुकूनच असा एखादा व्यक्ती सापडेल ज्याला तरुंगात रहायचं असेल. मुळात जे आत आहेत तेच बाहेर येण्यासाठी प्रार्थना करतात, पण हिमाचलमध्ये एक असा व्यक्ती आहे.
(Image Credit : mentalfloss.com)
जगात चुकूनच असा एखादा व्यक्ती सापडेल ज्याला तरुंगात रहायचं असेल. मुळात जे आत आहेत तेच बाहेर येण्यासाठी प्रार्थना करतात, पण हिमाचलमध्ये एक असा व्यक्ती आहे. हा व्यक्ती तरुंगातून सुटून आल्यावर काही दिवसातच पुन्हा तुरुंगात जाण्याची मागणी करु लागला.
तरुंगात जाणाऱ्या व्यक्तीकडे समाजात कधीही चांगल्या दृष्टीने पाहिलं जात नाही. त्यामुळे काही लोकांचं तरुंगातून आल्यावर एक सामान्य जीवन जगणं कठीण होऊन बसतं. असंच काहीसं हिमाचलमधील या व्यक्तीसोबत झालं आहे. तरुंगातील शिक्षा पूर्ण झाल्यावर हा व्यक्ती जेव्हा आपल्या घरी पोहोचला तेव्हा परिवाराने आणि समाजाने त्याला चांगली वागणूक दिली नाही. त्याच्याशी इतकं वाईट वागण्यात आलं की, त्याला पुन्हा तरुंगात जाऊन रहायचं आहे. यासाठी त्याने तरुंगाच्या प्रशासनाकडे मागणीही केली आहे.
धक्कादायक बाब म्हणजे हा व्यक्ती तरुंगातून सुटून केवळ दिवसच झाले होते. अशात त्याने लगेच पुन्हा तरुंगात जाण्यासाठी अर्ज केलाय. या व्यक्तीने सांगितलं की, शिक्षा पूर्ण करुन तो घरी परतला होता, पण त्याचा कुणीही स्विकार केला नाही.
हा व्यक्ती तुरुंगात कपडे शिवण्याचं काम करुन महिन्याला ५ हजार रुपये बचत करत होता. आता त्याला पुन्हा तुरुंगात जाऊन कपडे शिवण्याचं काम करायचं आहे. पण या व्यक्तीच्या या मागणीमुळे तरुंग प्रशासन प्रश्नात पडलं आहे. पोलिसांचं म्हणनं आहे की, असा काही कायदा नाहीये. ज्याव्दारे या व्यक्तीला पुन्हा तरुंगात ठेवलं जाईल. पण या व्यक्तीच्या मागणीवर विचार केला जात आहे.