ग्रँड मास्टर! 10 महिन्यांच्या मुलाने रचला इतिहास; 8 वर्ल्ड रिकॉर्ड मोडून झाला 'द डॉक्यूमेंट बॉय'
By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2023 04:19 PM2023-12-05T16:19:11+5:302023-12-05T16:32:09+5:30
10 महिन्यांच्या मुलाचं नाव एशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये देखील समाविष्ट करण्यात आले आहे. लोक त्याला आता 'द डॉक्युमेंट बॉय' म्हणून ओळखू लागले आहेत.
ग्रेटर नोएडामधील एका सोसायटीत राहणारा अवघ्या 10 महिन्यांचा रिवांश मिश्रा एकापाठोपाठ एक असे तब्बल आठ वर्ल्ड रेकॉर्ड मोडून ग्रँड मास्टर ठरला आहे. रेवांशची सर्व सरकारी कागदपत्रं लहान वयातच तयार झाली आहेत. त्याने वर्ल्ड रेकॉर्ड मोडून भारताची मान अभिमानाने उंचावली आहे. या 10 महिन्यांच्या मुलाचं नाव एशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये देखील समाविष्ट करण्यात आले आहे. लोक त्याला आता 'द डॉक्युमेंट बॉय' म्हणून ओळखू लागले आहेत.
10 महिन्यांच्या रिवांशकडे सर्व कागदपत्रं आहेत जी अनेक ज्येष्ठ नागरिकांकडेही नाहीत. ग्रेटर नोएडा येथील गॉड सिटी येथे मयंक मोहित मिश्रा आपल्या कुटुंबासह राहतात. ते जलसंधारणाच्या क्षेत्रात काम करतात. मयंक यांना 10 महिन्यांचा मुलगा असून त्याचं नाव रिवांश आहे. रेवंशाच्या 10 महिन्यांची सर्व सरकारी कागदपत्रं तयार झाली आहेत. रिवांशचे जन्माचा दाखला आणि आधार कार्ड अवघ्या तीन दिवसांत बनवण्यात आले.
रिवांशचे नाव इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि एशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्येही नोंदवले गेले आहे. अवघ्या 2 महिन्यांच्या वयात त्याची सर्व कागदपत्रं तयार केल्यानंतर आता वयाच्या 10 महिन्यांत त्याच्या नावावर अनेक जागतिक विक्रम नोंदवले गेले आहेत. रिवांशच्या वडिलांनी सांगितलं की, अलीकडेच त्यांचा मुलगा रिवांशच्या रेकॉर्डचे गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये देखील मूल्यांकन करण्यात आले आहे. रिवांशचा जन्म 15 जानेवारी 2023 रोजी झाला होता.
रेवांशच्या जन्माचा दाखल, आधार कार्ड, गव्हर्नमेंट व्हॅक्सीनेशन कार्ड, पॅन कार्ड, ABHA कार्ड, बँक अकाऊंट, पीपीएफ अकाऊंट, किसान विकास पत्र, एलआयसी, आरडी, एफडी, डेबिट कार्ड आणि चेकबुक, मूळ रहिवासी प्रमाणपत्र, पोस्ट ऑफिस अकाऊंट काढण्यात आलं आहे. एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्सने या मुलाच्या विक्रमाला ग्रँड मास्टर असं म्हटलं आहे. आता सर्वजण रिवांशला ‘द डॉक्युमेंट बॉय’ म्हणून ओळखू लागले आहेत. hindi.news18 ने याबाबतचे वृत्त दिले आहे.