'या' १० कारणांमुळे छोटासा भूतान ठरतो जगातला सगळ्यात वेगळा देश!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2019 12:29 PM2019-05-18T12:29:28+5:302019-05-18T12:38:22+5:30

२००६ साली प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानुसार भूतान हा आर्थिकदृष्ट्या गरीब असला तरी तो आशियातील सर्वात आनंदी तर जगातील ८वा सर्वात आनंदी देश आहे.

10 Reasons Why Tiny Bhutan Stands Out From The Rest Of The World | 'या' १० कारणांमुळे छोटासा भूतान ठरतो जगातला सगळ्यात वेगळा देश!

'या' १० कारणांमुळे छोटासा भूतान ठरतो जगातला सगळ्यात वेगळा देश!

googlenewsNext

भूतान हा भारताच्या उत्तर सीमेवरील एक छोटा देश आहे. भूतानच्या तीन दिशांना भारत देश तर चौथ्या दिशेस चीन देश आहे. भूतानच्या पूर्वेस अरुणाचल प्रदेश, पश्चिमेस सिक्कीम, दक्षिणेस पश्चिम बंगाल व उत्तरेस तिबेट आहे. थिंफू ही भूतानची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. २००६ साली प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानुसार भूतान हा आर्थिकदृष्ट्या गरीब असला तरी तो आशियातील सर्वात आनंदी तर जगातील ८वा सर्वात आनंदी देश आहे. भूतानबाबतच्या अशाच काही तुम्हाला माहीत नसलेल्या गोष्टी तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. 

आर्थिकदृष्ट्या गरिब पण आनंदी देश

१९७१ पासून विकासाचा रेशो मोजण्यासाठी केवल जीडीपीचा आधार घेणं हे नाकारलं आहे. त्यांनी विकासाच्या वेगवेगळ्या वाटा शोधल्या आहेत. त्यांनी आध्यात्मिक, शारीरिक, सामाजिक आणि पर्यावरण विकासाकडे अधिक प्राधान्य दिलं आहे. 

कार्बन नसलेला जगातला एकमेव देश

जगभरातील वेगवेगळे देश हे कार्बन कंट्रोल करण्यासाठी धडपड करत आहेत. पण भूतानला याची चिंता नाही. रिपोर्टनुसार, भूतानमध्ये दरवर्षी १.५ मिलियन टन कार्बन उत्सर्जित होतो. पण भूतान ६ मिलियन टन कार्बन दूर करू शकतो. 

६० टक्के जमिनीवर जंगलाचा कायदा

भूतानच्या संविधानात असा कायदा आहे की, ६० टक्के देशाची जमीन जंगलाने व्यापलेली असावी. रिपोर्ट्सनुसार, भूतान हा जगातल्या सर्वात जास्त जंगल परिसर असलेला देश आहे. येथील ७१ टक्के जमिनीवर जंगल आहे. 

पारंपारिक वेशभूषा

देशाची संस्कृती टिकवून ठेवण्यासाठी त्यांचं पालन करण्यासाठी भूतानमधील लोक कामाच्या तासांवेळी पारंपारिक वेशभूषा परिधान करतात. त्यांना हीच वेशभूषा करावी लागते. 

ट्रॅफिक लाइट नसलेला एकमेव देश

भूतान हा जगातला असा एकमेव देश आहे जिथे ट्रॅफिक लाइट नाहीत. भूतानमध्ये केवळ एक ट्रॅफिक सिग्नल Thimphu मध्ये आहे. आणि इथे हातांच्या माध्यमातून ट्रॅफिक कंट्रोल केलं जातं. 

रेल्वे नसलेला देश

भूतानमध्ये अजूनही रेल्वे सेवा नाही. भारताने यासाठी मदत करण्यासाठी हात पुढे केला होता. पण अजून यावर काहीही झालं नाही. भूतानमध्ये अजूनही केवळ रस्ते आणि हवाई मार्गाने वाहतूक होते.

भूतानकडे एअरफोर्स आणि नेव्ही नाही

भूतानमध्ये नेव्ही नाही. तसेच त्यांच्याकडे एअरफोर्सही नाही. त्यांना इमर्जन्सीमध्ये भारतीय एअरफोर्सकडून मदत केली जाते. 

प्लास्टिक बॅगवर बंदी

भूतान हा प्लास्टिकवर पहिल्यांदा बंदी घालणाऱ्या काही मोजक्या देशांपैकी एक आहे. इथे १९९९ मध्येच प्लास्टिकवर बंदी घालण्यात आली होती.  

सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान बंदी

भूतान हा टोबॅको कंट्रोल लॉ असलेला मोजक्याच देशांपैकी एक आहे. तसेच इथे सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करण्यास तसेच तंबाखू खाण्यावरही बंदी आहे. 

रविवारी पेपर नाही

रविवारी भूतानमध्ये सगळ्या गोष्टींना सुट्टी असते. या दिवशी लोक पेपरही वाचत नाही. 

Web Title: 10 Reasons Why Tiny Bhutan Stands Out From The Rest Of The World

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.