बाबो! 'इथे' सापडलं १० हजार वर्ष जुन्या विशाल प्राण्याचं बुलेट प्रूफ सुरक्षा कवच!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2019 03:29 PM2019-10-05T15:29:22+5:302019-10-05T15:33:34+5:30
आजपासून हजारो वर्षांआधी पृथ्वीवर विशाल जीव राहत होते. त्यातील डायनोसोर हे आपण सर्वांनाच माहीत आहे. हे जीव किंवा प्राणी आपल्या वेगळेपणांसाठी ओळखले जातात.
आजपासून हजारो वर्षांआधी पृथ्वीवर विशाल जीव राहत होते. त्यातील डायनासोर हे आपण सर्वांनाच माहीत आहे. हे जीव किंवा प्राणी आपल्या वेगळेपणांसाठी ओळखले जातात. भलेही आता ते लुप्त झाले आहेत. पण त्यांची हाडे किंवा अवशेष वेळोवेळी संशोधकांना सापडत असतात. एका अशाच विशाल लुप्त झालेल्या एका प्राण्याचं बुलेट प्रूफ सुरक्षा कवच सापडलं आहे. जे १० हजार वर्ष जुनं मानलं जात आहे.
अर्जेंटिनाच्या ग्रेटर ब्यूनस आयर्सच्या फ्लेचामध्ये मच्छिमारांच्या एका समूहाने हे बुलेट प्रूफ सुरक्षा कवच शोधलं आहे. जे कित्येक वर्षांपासून वाळूखाली दबलेलं होतं. हे सुरक्षा कवच गलायप्टोडॉन्ट प्रजातीच्या जनावरांचं असल्याचं सांगितलं आहे.
(Image Credit : Ruptly)
हजारो वर्षांआधी ग्लायप्टोडॉन्ट प्रजातीचे जनावर दक्षिण अमेरिकेत आढळत होते. त्यांच्या शरीरावर मजबूत ढालीसारखं सुरक्षा कवच असायचं. जे बुलेट प्रूफ होतं.
२०१६ मध्ये एक रिसर्च प्रकाशित झाला होता. त्यानुसार ग्लायप्टोडॉन दक्षिण अमेरिकेत लाखो वर्षांआधी अस्तित्वात होते. चार पायांच्या या प्राण्यांच्या शरीराच्या चारही बाजूने हाडांपासून तयार होणारं एक सुरक्षा कवच असायचं. हे दोन इंच जाड असायचं.
(Image Credit : allthatsinteresting.com)
असे मानले जाते की, ग्लायप्टोडॉनची लांबी साधारण ११ फूट आणि वजन २ हजार किलोपर्यंत असायचं. हे प्राणी आता आढळणाऱ्या आर्मडिलोचे पूर्वज आहेत. जे कीटक आणि झाडे खातात.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, २०१५ मध्ये याच परिसरात जोन एंटोनिया निवास नावाच्या एका शेतकऱ्याला ग्लायप्टोडॉनचं बुलेट प्रूफ कवच सापडलं होतं. त्याला ते डायनासोरचं अंड वाटलं होतं. ही बाब त्याने त्याच्या पत्नीला सांगितली होती. पण तिला ती गंमत वाटली होती. नंतर वैज्ञानिकांनी हे ग्लायप्टोडॉनचं सुरक्षा कवच असल्याचं सांगितलं होतं.