याला कितीही खायला द्या याचं पोट भरतच नाही, पालकही झाले हैराण; आहे विचित्र आजाराने ग्रस्त

By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2022 12:13 PM2022-03-09T12:13:17+5:302022-03-09T12:15:02+5:30

अवघ्या १० वर्षांचा मुलगा ज्याला कितीही खायला दिलं तरी त्याचं पोट भरत नाही (10 Year Old Boy Never Feels Full) . त्याची भूक शमत नाही (Boy always feels hungry). त्याच्या या खाण्याच्या सवयीमुळे त्याचे पालकही हैराण झाले आहेत.

10 year old boy eats a lot but feel hungry all the time | याला कितीही खायला द्या याचं पोट भरतच नाही, पालकही झाले हैराण; आहे विचित्र आजाराने ग्रस्त

याला कितीही खायला द्या याचं पोट भरतच नाही, पालकही झाले हैराण; आहे विचित्र आजाराने ग्रस्त

googlenewsNext

खाण्याचे शौकिन खूप लोक असतात. म्हणजे त्यांना खायला इतकं आवडतं की ते कधीही आणि कितीही खाऊ शकतात. असं असलं तरी त्याचीही एक मर्यादा असते. म्हणजे आपल्याला खायला कितीही आवडत असलं तरी भूक शमते, पोट भरतं, मन समाधानी होतं आणि त्यावेळी आपण खाणं थांबवतो. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल अवघ्या १० वर्षांचा मुलगा ज्याला कितीही खायला दिलं तरी त्याचं पोट भरत नाही (10 Year Old Boy Never Feels Full) . त्याची भूक शमत नाही (Boy always feels hungry). त्याच्या या खाण्याच्या सवयीमुळे त्याचे पालकही हैराण झाले आहेत.

सिंगापूरमध्ये राहणारा अवघ्या डेव्हिड. ज्याचं वय फक्त १० वर्षे आहे पण त्याचं खाणं प्रौढ व्यक्तीसारखं किंवा त्यापेक्षाही जास्त आहे. म्हणजे त्याने किती वेळापूर्वी आणि किती खाल्लं याचा त्याला काहीच फरक पडत नाही. त्याला कधीही भूक लागल्यासारखं वाटतं. तो सतत भुकेला असतो.

त्याच्या भुकेचं कारण आहे ते म्हणजे त्याला असलेला एक विचित्र आजार  (boy always feel hungry due to rare condition) .  त्याला Prader-Willi syndrome  नावाचा विचित्र आजार आहे. यामध्ये भूक कधीच शमत नाही. तो खातो पण आता आपली भूक शमली आहे किंवा आपण समाधानी आहोत, याचा सिग्नल त्याच्या मेंदूपर्यंत पोहोचत नाही. डॉक्टरांच्या मते, मानवी जिन्समधील क्रोमोसोम  १५ गायब झाल्याने ही समस्या उद्भवते. या सिंड्रोमवर कोणताच उपचार नाही. त्याला फक्त नियंत्रणात ठेवता येऊ शकतं.

\पण त्याच्या या आजारामुळे बऱ्याच समस्या उद्भवत आहेत. त्याचं वजन वाढतं आहे.  त्याच्या पालकांना त्याला खाण्यापासून रोखण्यात खूप त्रास होतो. The Strait Times च्या रिपोर्टनुसार त्याच्या घरातील किचनलाही टाळं लावलं जातं जेणेकरून गरजेपेक्षा तो जास्त खाऊ नये. त्याच्यासाठी खाण्याचं एक टाइमटेबल तयार करण्यात आलं आहे, त्यानुसारच त्याला खायला दिलं जातं.

Web Title: 10 year old boy eats a lot but feel hungry all the time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.