अबब! या १० वर्षाच्या मुलीचं नाव वाचून तुम्ही म्हणाल, हे नाव आहे की डिक्शनरी?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2018 12:45 PM2018-10-15T12:45:28+5:302018-10-15T12:47:52+5:30

नाव जितकं लहान आणि सोपं असेल तितकं ते लक्षात ठेवायला बरं पडतं. भारतातही दक्षिण भारतीय समाजार लांबलचक नावं ठेवण्याची परंपरा आहे.

This 10 year old girl has 25 middle names honouring boxing stars and is tuff to remember | अबब! या १० वर्षाच्या मुलीचं नाव वाचून तुम्ही म्हणाल, हे नाव आहे की डिक्शनरी?

अबब! या १० वर्षाच्या मुलीचं नाव वाचून तुम्ही म्हणाल, हे नाव आहे की डिक्शनरी?

googlenewsNext

नाव जितकं लहान आणि सोपं असेल तितकं ते लक्षात ठेवायला बरं पडतं. भारतातही दक्षिण भारतीय समाजार लांबलचक नावं ठेवण्याची परंपरा आहे. या नावांमध्ये गावाच्या नावापासून ते पूर्वजांचीही नावे जोडलेली असतात. पण ब्रिटनच्या एका १० वर्षाच्या मुलीचं नाव इतकं मोठं आहे की, स्वत: तिलाही हे नाव लक्षात ठेवायला कठीण आहे. या मुलीच्या नावाच्या तब्बल २५ मिडल नेम आहेत. म्हणजे एकूण २७ शब्दांचं तिचं नावं आहे. 

आता पुढे काही वाचण्याआधी एकदा या मुलीचं नाव वाचा. Willow Sullivan Corbett Fitzsimmons Jefferies Hart Burns Johnson Willard Dempsey Tunney Schmeling Sharkey Carnera Baer Braddock Louis Charles Walcott Marciano Patterson Johansson Liston Clay Frazier Foreman Taylor-Brown. होय हेच तिचं पूर्ण नाव आहे. तसे तिला लोक विलो टेलर ब्राउन या नावाने हाक मारतात. 

गंमीतदार बाब म्हणजे विलो टेलर ब्राउनच्या नावात २५ मिडल नेम आहेत. ही सर्व नावे महान बॉक्सिंग चॅम्पियन्ससोबत जुळलेले आहेत. यात तुम्हाला मोहम्मद अलींपासून ते जॉर्ज फॉरमॅन यांच्या नावांचा समावेश आहे. बरं यात टेलर ब्राउनचा काहीही दोष नाहीये. कारण तिच्या परिवारात असं नाव ठेवण्याची परंपरा आहे. 

विलोच्या बर्थ सर्टिफिकेटमध्ये इतकं लांबलचक नाव जोडलेलं आहे. तिचा जन्म ९ ऑक्टोबर २००८ मध्ये झालाय. स्थानिक मीडिया रिपोर्टनुसार, टेलरच्या परिवारात ही नाव ठेवण्याची परंपरा १९७४ पासून सुरु आहे. तिच्या आईचही हेच नाव होतं. झालं असं की, विलोचे पंजोबा ब्रिएन ब्राउन हे बॉक्सिंगचे फार मोठे चाहते होते. ते जगभरात फिरण्यासाठीही लोकप्रिय होते. 

विलोची आई सांगते की, 'अजून तिला तिचं पूर्ण माहितही नाही. यातील काही शब्दच ती लक्षात ठेवू शकते. लांबलचक नाव असल्याने अनेकदा गंमत केली जाते. माझ्या पासपोर्टवर तर इतकं मोठं नाव नाहीये, पण विलोच्या आहे. त्यामुळे ती जिथेही जाते तिला तिचं पूर्ण नाव लक्षात आहे का हे विचारलं जातं'.

Web Title: This 10 year old girl has 25 middle names honouring boxing stars and is tuff to remember

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.