१० वर्षांपासून मुलगा फक्त ब्रेड- दहीच खातो

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2021 06:31 AM2021-08-25T06:31:40+5:302021-08-25T06:31:52+5:30

इतर पदार्थ समोर आणले की रडायला लागतो

For 10 years, the boy has been eating only bread and curd | १० वर्षांपासून मुलगा फक्त ब्रेड- दहीच खातो

१० वर्षांपासून मुलगा फक्त ब्रेड- दहीच खातो

googlenewsNext

नॉरफोक सिटी (इंग्लड) : जगात कल्पनाही करता येणार नाहीत, असे आजार आहेत. अशाच एका विचित्र आजाराला एश्टन फिशर हा १२ वर्षांचा मुलगा तोंड देत आहे. या आजारामुळे तो सामान्य मुलांसारखे वेगवेगळे पदार्थ खाऊ शकत नाही. त्याचा गेल्या १० वर्षांपासूनचा आहार आहे ब्रेड आणि दही. हे दोन पदार्थ वगळून तिसरा पदार्थ त्याला खायला दिला तर तो रडायला लागतो. 

एश्टनच्या आई-वडिलांनी त्याला इतर पोषक पदार्थ खाऊ घालण्याचे केलेले प्रयत्न अपयशी ठरले. आता त्यांना त्याच्या आहाराची मोठी काळजी वाटते. एश्टनचे वय वाढत असून, तो शरीराची नैसर्गिक  वाढ होण्यासाठी सामान्य मुलांसारखा अनेक प्रकारचे पदार्थ खाऊ शकत नाही.  एश्टनच्या आई-वडिलांनी डॉक्टरांशी चर्चा केल्यावर त्याचा आजार हा फूड फोबिया असल्याचे ते म्हणाले. या आजारामुळे  एश्टनला दुसरे पदार्थ खायला आवडत नाहीत.

त्याची आई मां कारा म्हणाल्या की, ‘जुलै महिन्यात एश्टनला इटिंग डिसऑर्डर स्पेशालिस्टकडे नेले तेव्हा एश्टनला खाण्याचीच भीती वाटते, असे ते म्हणाले.’  इटिंग डिसऑर्डर स्पेशालिस्टने सांगितले की, ‘एश्टनला अव्हॉडंट रिस्ट्रिक्टिव्ह फूड इन्टेक डिसऑर्डर असून, त्यामुळे त्याला काेणताही वेगळा पदार्थ खाण्याची भीती वाटते.  एश्टनला गरज असलेले कोणतेच पोषक घटक मिळत नसल्यामुळे काळजीत आहोत, असे त्याची आई मां कारा म्हणाल्या. 

प्रयत्न करतोय
आता एश्टनला समुपदेश व इतर मार्गांनी वेगवेगळे पदार्थ खाण्यासाठी तयार केले जात आहे. एश्टनचा आत्मविश्वास जागरूक होत आहे. तो इतर पदार्थ खाण्याचा प्रयत्न करीत आहे, असेही त्या म्हणाल्या.

Web Title: For 10 years, the boy has been eating only bread and curd

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.