बाबो! १००व्या वर्षी आजोबा चढले बोहल्यावर, नवऱ्यामुलीचं वय वाचून बसेल धक्का!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2022 15:49 IST2022-02-18T15:41:35+5:302022-02-18T15:49:39+5:30
शंभराव्या वाढदिवसी काहीतरी खास करायचं असं त्यांच्या नातवंडांनी ठरवलं होतं. पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद जिल्ह्यात राहणाऱ्या विश्वनाथ सरकार यांनी बुधवारी आपली ९० वर्षीय पत्नी सरोधवानी यांच्यासोबत भव्य विवाह केला.

बाबो! १००व्या वर्षी आजोबा चढले बोहल्यावर, नवऱ्यामुलीचं वय वाचून बसेल धक्का!
लग्न हा प्रत्येक माणसाच्या आयुष्यातील अतिशय महत्त्वाचा क्षण असतो, असं म्हटलं जातं. अनेकदा लग्नाच्या अतिशय रंजक (Unique Marriage Stories) आणि कधीकधी हैराण करणाऱ्या घटनाही आपल्याला ऐकायला किंवा वाचायला मिळतात. मात्र, आज जी घटना समोर आली आहे ती अतिशय आगळीवेगळी आहे. यात एका व्यक्तीने आपला १०० वा वाढदिवस साजरा करण्यासाठी आपल्या पत्नीसोबत दुसऱ्यांदा लग्न केलं . त्यांच्या शंभराव्या वाढदिवसी काहीतरी खास करायचं असं त्यांच्या नातवंडांनी ठरवलं होतं. पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद जिल्ह्यात राहणाऱ्या विश्वनाथ सरकार यांनी बुधवारी आपली ९० वर्षीय पत्नी सरोधवानी यांच्यासोबत भव्य विवाह केला.
या वृद्ध दाम्प्त्याची सून गीता सरकारने सांगितलं की, 'ही कल्पना तेव्हा सुचली जेव्हा काही महिन्यांपूर्वी सोशल मीडियावर असंच काही पाहिलं. यानंतर मी कुटुंबातील इतर सदस्यांनाही याबद्दल सुचवलं आणि सगळ्यांना ही कल्पना आवडली'. या कपलचं लग्न १९५३ साली झालं होतं. या कपलची मुलं, नातवांडं आणि परतवांडं इतर राज्यांमध्ये राहतात. मात्र, या लग्नासाठी त्यांनीही हजेरी लावली. (Old Man Married at Age of 100)
या कपलच्या नातंवांडांमधील एक पिंटा मोंडोलने म्हटलं की नवरी नवरदेवाच्या कुटुंबात येते, त्यामुळे आम्ही त्यानुसारच प्लॅनिंग केलं. यानुसार आजोबांनी आपल्या गावातील घरी ठेवण्यात आलं. तर आजीला लग्नाच्या दोन दिवस आधी शेजारच्या गावातील घरी ठेवलं गेलं.
नातींनी ९० वर्षाच्या नवरीला तयार होण्यासाठी मदत केली. तर नातू आजोबांना तयार करत होते. विश्वनाथ सरकार बुधवारी आपल्या नवरीला आणण्यासाठी तिच्या घरी घोडीवर बसून गेले. नवरदेव तिथे पोहोचताच फटाके फोडण्यात आले. दोघांनाही अगदी नवरी-नवरदेवाप्रमाणे सजवलं गेलं होतं. लग्नासोबतच भोजनाची व्यवस्थाही केली गेली होती आणि यासाठी शेजाऱ्यांनाही निमंत्रण देण्यात आलं.