तब्बल १०० वर्षे जुनी तिजोरी सापडली अन् चावी बनवायला ३ दिवस, वाचा नेमकं काय दंडलय यात?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2022 10:33 PM2022-07-24T22:33:54+5:302022-07-24T22:35:01+5:30
एका तिजोरीची चावी बनविण्यासाठी तब्बल 3 दिवस लागल्याची घटना घडली आहे.
अनेकदा आपल्याकडून घराची अथवा गाडीची चावी हरवत असते. अशावेळेस आपण त्वरित दुसरी चावी तयार करून घेतो. मात्र एका तिजोरीची चावी बनविण्यासाठी तब्बल 3 दिवस लागल्याची घटना घडली आहे.
गुजरातमधील महिधपुरा येथे राहणाऱ्या जय रूवाला यांच्या पणजोबांनी इंग्लंडवरून मागवलेल्या तिजोरीची चावीच हरवली. ही तिजोरी 100 वर्ष जूनी असून, याचे वजन 200 किलो आहे. तिजोरीची लांबी 2 फूट, रूंदी 1.5 फूट आणि उंची 2.5 फूट आहे. तिजोरी फायरप्रुफ असून, आग लागली तरी देखील आतील सामानाला कोणतेही नुकसान होत नाही. अखेर या 100 वर्ष जुन्या तिजोरीची चावी बनविण्यासाठी तब्बल 3 दिवस लागले.
रूवाला परिवाराला वारसा म्हणून ही तिजोरी मिळालेली आहे. याच्या दरवाजाची जाडी 6 इंच आहे. 12 जणांनी मिळून प्रयत्न केला तरी ही तिजोरी उचलली जात नाही. लोखंडाच्या सळाईने सरकवण्याचा प्रयत्न देखील अपयशी ठरला.