१०४ वर्षीय आजीचं तुरूंगात जाण्याचं होतं स्वप्न, पोलिसांनी काय केलं असावं?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2019 11:30 AM2019-03-26T11:30:52+5:302019-03-26T11:33:39+5:30
तुरूंगात जाणं कधी कुणाचं स्वप्न असू शकतं यावर कुणाचा विश्वास बसणार नाही. पण इंग्लंडमध्ये राहणाऱ्या १०४ वर्षीय ऐनी ब्रोकनब्रो यांचं एकच स्वप्न होतं.
तुरूंगात जाणं कधी कुणाचं स्वप्न असू शकतं यावर कुणाचा विश्वास बसणार नाही. पण इंग्लंडमध्ये राहणाऱ्या १०४ वर्षीय ऐनी ब्रोकनब्रो यांचं एकच स्वप्न होतं. महत्त्वाची गोष्टी म्हणजे वयाच्या या वळणावर त्या त्यांचं स्वप्न पूर्ण करू शकल्या. त्यांचं स्वप्न होतं आयुष्यात एकदातरी पोलिसांनी त्यांना अटक करावी.
केअर होममध्ये राहणाऱ्या ऐनी यांचं स्वप्न अखेर पूर्ण झालं. त्यांच्याकडून एक फॉर्म भरवून घेण्यात आला. यात त्यांना त्यांची इच्छा विचारण्यात आली होती. त्यांनी त्यात लिहिलं की, 'माझी इच्छा आहे की, मला अटक केली जावी. मी १०४ वर्षांची आहे आणि मी कधीच कायद्याचं उल्लंघन केलं नाही'.
बस मग काय या १०४ वर्षीय आज्जीचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी लोकल पोलिसांची टीम आली. त्यांनी फेसबुकवर लिहिले की, 'आम्हाला ब्रिस्टल विशिंग वाशिंगची ही आयडिया पसंत पडली. आम्ही लोकल पोलीस टीम १०४ वर्षीय ऐनीसाठी पाठवत आहोत. इंटरनॅशनल हॅपीनेस डे च्या दिवशी म्हणजेच २० मार्चला ऐनीला अटक करण्यासाठी पोलिसांची टीम पाठवण्यात आली. अशाप्रकारे ऐनीचं स्वप्न पूर्ण झालं.
ऐनी यांचं स्वागत तुरूंग प्रशासनाने केलं. तसेच त्यांना तरूंगाची चांगल्याप्रकारे सफर करवण्यात आली. तसेच कैद्यांना कसं ठेवलं जातं याचीही माहिती त्यांना देण्यात आली. ऐनीची ही कहाणी सध्या चांगलाच चर्चेचा विषय ठरत आहे.