घरात धूळ खात पडलेल्या फुलदाणीनं केलं मालामाल, मिळाली एवढी रक्कम, आकडा ऐकून विस्फारतील डोळे
By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2022 08:14 PM2022-05-20T20:14:55+5:302022-05-20T20:15:21+5:30
Jara Hatke News: जगामध्ये अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या खूप दुर्मीळ आहेत, तसेच अनेक दशकांपासून त्याचं आकर्षण अधिकाधिक वाढत आहे. अशीच एक अत्यंत सुंदर आणि दुर्मीळ चिनी फुलदाणी एका कुटुंबाकडे गेल्या चार दशकांपासून आहे. ही दुर्मीळ फुलदाणी १८ व्या शतकातील असल्याचे सांगण्यात येत आहे.
लंडन - जगामध्ये अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या खूप दुर्मीळ आहेत, तसेच अनेक दशकांपासून त्याचं आकर्षण अधिकाधिक वाढत आहे. अशीच एक अत्यंत सुंदर आणि दुर्मीळ चिनी फुलदाणी एका कुटुंबाकडे गेल्या चार दशकांपासून आहे. ही दुर्मीळ फुलदाणी १८ व्या शतकातील असल्याचे सांगण्यात येत आहे. ही फुलदाणी ब्रिटनमधील मि़डलँड्समध्ये राहणाऱ्या एका कुटुंबाकडे होती. हल्लीच या फुलदाणीची १.२ मिलियन पौंड्स म्हणजेच सुमारे ११.५३ कोटी रुपयांना विक्री झाली. आश्चर्याची बाब म्हणजे या फुलदाणीच्या मालकाला ही फुलदाणी एवढी मौल्यवान आहे याची माहिती नव्हती. त्याच्या घरामध्ये ही फुलदाणी एक कोपऱ्यात धुळ खात पडली होती.
ही फुलदाणी सुमारे दोन फूट लांब आहे. निळी चमकदार चांदी आणि गिल्टने बनलेल्या या फुदाणीच्या तळभागावर १८ व्या शतकातील राजा क्वियानलोंगच्या काळातील ६ अक्षरांची मोहोर लागलेली आहे. या फुलदाणीवर सोने आणि चांदी जडवण्यात आली आहे. तसेच त्यावर आठ अमर प्रतीके लावण्यात आली आहेत. जी दीर्घायू होण्याची आणि घरात समृद्धी असण्याचे प्रतीक आहे.
या अँटिक फुलदाणीच्या मौल्याबाबत मालकाला काहीच माहिती नव्हती. ते तिला घराच्या सजावटीमध्ये वापरत असत. जेव्हा या फुलदाणीला किरकोळ तडा गेला तेव्हा तिला किचनमधून हटवून डायनिंग रूममध्ये ठेवण्यात आले. तिथेच एका अँटिक एक्सपर्टची नजर त्यावर पडली. तिथेच त्याच्या किमतीची मालकांना मिळाली.
दरम्यान, या फुलदाणीची किंमत ९६ लाख रुपयांपासून १ कोटी ४४ लाख रुपयांपर्यंत असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र एका चिनी नागरिकांने सुमारे ११ कोटी ५३ लाख रुपयांना खरेदी केले. ही फुलदाणी त्यांच्या वारशाचा भाग होता, त्यामुळे त्यांनी ते एवढ्या महाग किमतीला खरेदी केले.