शाब्बास! पाचवीचा विद्यार्थी थेट दहावीची परिक्षा देणार; वयाच्या ११ व्या वर्षी पोरानं रचला इतिहास
By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2021 07:10 PM2021-02-02T19:10:30+5:302021-02-02T19:11:05+5:30
Inspirational Stories: मुलाचा आयक्यू १६ वर्षांच्या मुलाप्रमाणे आहे.
पाचवीचा विद्यार्थी दहावीची परिक्षा देणार... वाचून विश्वास बसत नाही ना पण हे खरं आहे. छत्तीसगढमधील लिवजोत नावाचा विद्यार्थी ११ वर्ष ४ महिन्यांच्या वयात माध्यमिक शिक्षण मंडळातून दहावीची परिक्षा देणार आहे. लिवजोत दुर्ग भागातील माईलस्टोन शाळेत शिकतो. पण आपल्या IQ च्या जोरावर हा विद्यार्थी १० वी ची परिक्षा देणार आहे. लिवजोतचे वडील गुरविंदर यांनी १५ ऑक्टोबरला माध्यमिक शिक्षण मंडळातील अध्यक्ष आणि सचिवांकडे अर्ज दिला होता. त्यांच्या मुलाचा आयक्यू १६ वर्षांच्या मुलाप्रमाणे आहे. त्यासाठी लिवजोतला दहावीच्या परिक्षेला बसण्याची अनुमती द्यावी. असं या अर्जात नमुद करण्यात आलं होतं.
छत्तीसगढमध्ये असा नियम आहे की, जर एखाद्या विद्यार्थ्यांचा आयक्यू चांगला असेल तर त्याला परिक्षेला बसण्याची अनुमती मिळू शकते. त्यासाठी लिवजोतनं शासकीय जिल्हा रुग्णालय दुर्गमध्ये आपली आयक्यू चाचणी करून घेतली होती. या चाचणीचा अहवाल आल्यानंतर लिवजोतला परिक्षेला बसण्याची परवानगी देण्यात आली.
लिवजोतनं १० वी च्या परिक्षेचा अभ्यास आतापासून करायला सुरूवात केली आहे. मोठं होऊन त्याला वैज्ञानिक बनायचे आहे. याआधीही मणिपूरमध्ये १२ वर्षाच्या विद्यार्थ्याला आणि बिहारमध्ये ९ वर्षाच्या विद्यार्थ्यांला १० वीची परिक्षा उत्तीर्ण होण्याची संधी मिळाली होती. बापरे! मासेमारी करणं चांगलंच अंगाशी आलं, डॉक्टरांनी घश्यातून काढला ७ इंचाचा मासा, पाहा व्हिडीओ
माध्यमिक शिक्षण मंडळ सचिव प्रोफेसर वीके गोयल यांनी सांगितले की, लिवजोत सिंह याच्या वडीलांनी अर्ज दिल्यानंतर आयक्यू चाचणी करण्यात आली होती. यानंतर परिक्षा समितीनं दिलेल्या परवानगीच्या आधारे दहावीची परिक्षा देण्याची अनुमती देण्यात आली होती. काय सांगता? ८ वर्षात ११६ मुलांचा पिता बनला; फेसबुकवर महिला करताहेत आई बनण्यासाठी विनंती