वयाच्या 110व्या वर्षी या पाकिस्तानी आजोबांनी केलं लग्न, त्याच्या मुलाचं वय वाचाल तर व्हाल हैराण
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2023 04:02 PM2023-08-22T16:02:04+5:302023-08-22T16:03:36+5:30
Weird Marriage ; आश्चर्याची बाब म्हणजे या व्यक्तीच्या परिवारात 84 सदस्य आहेत. त्याचे 12 मुलं आणि तेवढ्याच मुली. तसेच अनेक पुतणे आणि पुतण्याही राहतात.
Pakistan Viral Wedding : पाकिस्तानातून एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. उत्तर-पश्चिम पाकिस्तानच्या मानसेहरा शहरात एका 110 वर्षाच्या व्यक्तीने 55 वर्षीय महिलेसोबत लग्न केलं. खैबर पख्तूनख्वामध्ये 110 वर्षीय व्यक्तीचं चौथं लग्न झाल्यावर त्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. अब्दुल हन्नान स्वाति असं या व्यक्तीचं नाव असून त्याने 55 वर्षीय महिलेसोबत लग्न केलं.
आश्चर्याची बाब म्हणजे या व्यक्तीच्या परिवारात 84 सदस्य आहेत. त्याचे 12 मुलं आणि तेवढ्याच मुली. तसेच अनेक पुतणे आणि पुतण्याही राहतात. त्याचा सगळ्यात मोठा मुलगा 70 वयाचा आहे. या जोडप्याचं लग्न मनसेहरा जिल्ह्यातील एका मशिदीमध्ये लग्न लावण्यात आलं. लग्नाला परिवारातील सगळे सदस्य उपस्थित होते.
रिपोर्ट्समध्ये सांगण्यात आलं आहे की, अब्दुल हनान स्वाति मानसेहराच्या ग्राथली जूरी भागात राहणारे आहेत. हे त्यांचं चौथं लग्न आहे. स्वातिच्या सगळ्यात मोठ्या मुलाचं वय 70 आहे. तर पूर्ण परिवारात 84 सदस्य आहेत. त्यांचा निकाह एका स्थानिक मशिदीमध्ये लावण्यात आला. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.
याआधी काही दिवसांआधीच एका 95 वर्षीय व्यक्तीने पुन्हा लग्न केलं होतं. हे लग्न त्याच जिल्ह्यातील एका महिलेसोबत लावण्यात आलं होतं. त्याच्या पहिल्या पत्नीचं 2011 मध्ये निधन झालं होतं. त्याना 12 मुले आहेत.