पहिल्यांदाच उघडण्यात आलं 114 वर्ष जुनं मेडिकल स्टोर, काय सापडलं आत?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2023 12:26 PM2023-09-30T12:26:05+5:302023-09-30T12:27:40+5:30
हे ब्रिटनमध्ये विलियम व्हाइट नावाच्या व्यक्तीने सुरू केलं होतं. त्याच्या मृत्यूनंतर हे स्टोर बंद झालं. आता त्याचं लॉक उघडण्यात आलं आहे.
इतिहासाशी संबंधित गोष्टी वर्तमानात धूळ खात पडलेल्या सापडतात. मग त्यांच्यात ती बाब नसते जी आधी राहत होती. अशीच एक जागा सापडली आहे जी 114 वर्ष जुनी आहे. ही जागा तेव्हापासून कुणी बदलली ना पाहिली. आम्ही तुम्हाला एका मेडिकल स्टोरबाबत सांगत आहोत. ही मेडिकल स्टोर 1880 मध्ये सुरू करण्यात आलं होतं जे 1909 पर्यंत सुरू होतं. हे ब्रिटनमध्ये विलियम व्हाइट नावाच्या व्यक्तीने सुरू केलं होतं. त्याच्या मृत्यूनंतर हे स्टोर बंद झालं. आता त्याचं लॉक उघडण्यात आलं आहे. जिथे अनेक हैराण करणाऱ्या वस्तू सापडल्या.
मेट्रो यूकेच्या रिपोर्टनुसार, या मेडिकल स्टोरचा शोध 80 वर्षाआधीच लागला होता. विलियम व्हाइट यांच्या नातीने 1987 मध्ये याबाबत लोकांना सांगितलं होतं. आता हे स्टोर लोकांना दाखवण्यासाठी उघडण्यात आलं आहे. इथे लिक्विड मेडिसिनने भरलेली भांडी, स्केल, जुना टाइप रायटर आणि इतरही अनेक वस्तू सापडल्या आहेत. जेव्हा विलियम व्हाइट यांचं निधन झालं तेव्हा त्याचं घर विकलं जात होतं, तेव्हाच या स्टोरबाबत समजलं. याआधी अनेक वर्ष याबाबत कुणाला माहीत नव्हतं. व्हाइट यांच्या निधनानंतर त्यांचा मुलगा चार्ल्सने हे स्टोर बंद केलं होतं. जे बघून असं वाटतं की, वेळेनुसार ही जागा थांबली आहे.
एका संस्थेला जेव्हा या जागेबाबत समजलं तेव्हा त्यांनी ती सांभाळण्याची जबाबदारी घेतली. येथील वस्तूंची लिस्टींग केली. त्यांनी सांगितलं की, त्यांनी सगळ्या वस्तू आधीसारख्या ठेवल्या आहेत, जशा त्या आधी होत्या.
एका प्रवक्त्याने सांगितलं की, स्टोरमध्ये सापडलेल्या वस्तू पाहिल्यावर समजलं की, विलियम व्हाइट एक केमिस्ट होते. ते ग्रोसरीच्या वस्तूही ठेवत होते, जसे चहापत्ती, तंबाखू आणि वाइन. पण आता या वस्तू घातक मानल्या जात आहेत. त्यावेळी बॉटलमध्ये बंद केलेल्या गोष्टी आता जीवघेण्या ठरू शकतात. दुकानात काही जडीबुटीही सापडल्या आहेत. लोक आता हे स्टोर बघण्यासाठी येत आहेत.