आहे एका मुलाची आई पण नवरा कडेवर घेतो, तुम्ही कल्पनाही करु शकणार नाही असं आहे कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2022 11:36 AM2022-02-04T11:36:14+5:302022-02-04T11:50:13+5:30
काहीवेळा मुल आईकडे असते तर काहीवेळा बाबांकडे पण समजा आईचं बाबांच्या कडेवर असली तर? विचारात पडलात ना? मग वाचा पुढे...
नवरा बायको म्हटलं की एकत्र बाहेर फिरणं आलं. काहीवेळा मार्केटमध्ये शॉपिंगला जाणं, काहीवेळा पर्यटनासाठी जाणं. मात्र जेव्हा मुलं होतात तेव्हा एक जबाबदारी असते ती म्हणजे मुलांना उचलुन कोण घेणार? अनेकदा कपल या गोष्टीला वैतागतात. काहीवेळा मुल आईकडे असते तर काहीवेळा बाबांकडे पण समजा आईचं बाबांच्या कडेवर असली तर? विचारात पडलात ना? मग वाचा पुढे...
सायकिला नोरजमा अमीरा आणि मोहम्मद अजरी जैदी मलेशियाच्या टेरेंगगूनमध्ये राहणारं हे अनोखं कपल. या कपलला एक मुलगाही आहे. काही दिवसांपूर्वीच हे दोघं आईवडील झाले आहेत.
अमीराचा नवरा मोहम्मद अजरी जैदी तिच्यापेक्षा वयाने आठ वर्षांनी लहान आहे. २०२० साली दोघं पहिल्यांदाच एकमेकांना भेडले. अजरीला अमीरा आवडू लागली आणि दोघांचंही एकमेकांवर प्रेम जडलं. मार्च २०२१ मध्ये दोघांनी लग्न केलं. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण अजरी अमीरासोबत कुठेही गेला तरी तो तिला उचलून घेतो. यामागे एक खास कारण आहे.
अमीरा जिची उंची फक्त ११५ सेंटीमीटर आहे (115 cm Long Woman). कमी उंची असेलल्या व्यक्तींना बऱ्याच समस्यांना सामोरं जावं लागतं. त्यांना जोडीदार मिळत नाही, मूल होण्याची शक्यताही कमीच असते. यामुळे सहसा असे लोक खचतात. त्यांच्यामध्ये न्यूनगंड येतो, आत्मविश्वास कमी होतो. पण सायकिला याबाबतीत नशीबवान आहे. इतकी कमी उंची असूनही तिला फक्त तिचं खरं प्रेम, तिचा नवराच नाही तर आई होण्याचंही सुख मिळालं.
अमिराची उंची पाहतात अनेकांनी तिला स्वत:चं मूल जन्माला घालण्याचा विचारच करू नको, असा सल्ला दिला होता. इतकंच नव्हे कमी उंचीमुळे ती ९ महिने आपल्या गर्भात बाळ वाढवू शकेल अशी आशा डॉक्टरांनाही नव्हती. कारण बाळांची जन्मावेळी उंची सरासरी ४५ सेमी असते. त्यामुळे डॉक्टरांना हे अशक्य वाटत होतं. प्रेग्नन्सीआधी अमीरालाही आपण ९ महिने आपल्या पोटात बाळ घेऊन फिरू असं वाटलंही नव्हतं.
पण चमत्कार झाला. २५ जानेवारीला तिने एका मुलाला जन्म दिला. आमिरासाठीही ही सरप्राइझच होतं. आपला अनुभव शेअर करताना तिने सांगितलं की हा खरंच चमत्कार होता. प्रेग्नन्सीत काहीच अडचण आली नाही. डिलीव्हरीवेळी फक्त तिला जास्त सुरक्षा आणि देखरेखीची गरज पडली. तिला कडेवर घेऊन फिरणाऱ्या नवऱ्याला अमीराने सर्वात मोठं गिफ्ट दिलं. तो आता बाबा झाला आहे. यानंतर त्याच्या आनंदाला पारावर उरला नाही. अनेकांनी या कपलला शुभेच्छा दिल्या आहेत.