आली लहर केला कहर! १२ वर्षीय मुलाने खाल्ल्या ५४ चुंबकाच्या गोळ्या, कारण वाचून व्हाल थक्क.....
By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2021 09:54 AM2021-02-10T09:54:43+5:302021-02-10T09:54:56+5:30
रायलीने केलेला कारनामा समजल्यावर त्याची आई त्याला लगेच हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली. डॉक्टरांनी एक्स-रे काढला आणि तो पाहून ते हैराण झाले.
लंडनमध्ये(London) राहणाऱ्या १२ वर्षीय मुलाने एका प्रयोगासाठी चुंबकाच्या ५४ गोळ्या गिळंकृत केल्या ज्यानंतर त्याचा जीव धोक्यात आला होता. डॉक्टरांनी ६ तासांच्या ऑपरेशननंतर त्याच्या पोटातून चुंबकाच्या गोळ्या बाहेर काढल्या आणि त्याला जीवनदान मिळाले.
१२ वर्षीय रायली मॉरिसनने एक प्रयोग म्हणून असं केलं होतं. त्याला हे जाणून घ्यायचं होतं की, चुंबक खाल्ल्यानंतर शरीरात चुंबकीय पॉवर येते किंवा नाही. असं करून त्याच्या शरीराला धातू चिकटतो किंवा नाही हेही जाणून घ्यायचं होतं. इतकेच नाही तर टॉयलेटमधून या गोळ्या कशा निघतील याचीही त्याला उत्सुकता होती.
२ दिवसात ५४ गोळ्या खाल्ल्या
डेलीमेलच्या रिपोर्टनुसार, रायली मॉरिसनने पहिल्यांदा चुंबकाच्या गोळ्या १ जानेवारीला खाल्ल्या. त्यानंतर ४ जानेवारीला काही गोळ्या खाल्ल्या. पण याने त्याच्या शरीरात काहीच फरक पडला नाही. कोणतेही चुंबकीय गुण त्याला दिसले नाही. (हे पण वाचा : अरे देवा! हेअर स्प्रे संपला म्हणून या बाईनं डोक्याला ग्लू लावला; अन् मग झाली 'अशी' अवस्था...)
आईला सांगितलं....
चुंबकीय गोळ्या खाऊनही त्याचा काहीच प्रभाव दिसला नाही म्हणून रायली मॉरिसनने ही बाब आईला सांगितली. त्याने त्याच्या ३० वर्षीय पॅगे वार्ड आईला सांगितले की, त्याने चुंबकाच्या केवळ २ गोळ्या खाल्ल्या आहेत. (हे पण वाचा : बोंबला! ग्लोईंग त्वचेच्या नादात हळदीचा फेसपॅक लावायला गेली; अन् अख्ख्या चेहऱ्यावर झालं असं काही...)
डॉक्टर हैराण
रायलीने केलेला कारनामा समजल्यावर त्याची आई त्याला लगेच हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली. डॉक्टरांनी एक्स-रे काढला आणि तो पाहून ते हैराण झाले. कारण त्याच्या पोटात फार जास्त चुंबकाच्या गोळ्या होत्या. एक्स-रे मधून हेही समजलं की, चुंबक त्याच्या पोटात आणि आतड्यांमध्ये आहे.
६ तास चाललं ऑपरेशन
एक्स-रे नंतर डॉक्टरांनी अंदाज लावला होता की, त्याच्या पोटात ५-३० गोळ्या असतील. पण सर्जरीतून बाहेर काढण्यात आलेल्या गोळ्या पाहून डॉक्टर हैराण झाले. साधारण सहा तासांच्या सर्जरीनंतर चुंबकाच्या ५४ गोळ्या काढल्या आणि रायली मॉरिसनचा जीव वाचवण्यात आला.