121 वर्ष जुन्या कॅ़डबरी चॉकलेटचा होणार लिलाव, एक्सपायर झालं असूनही आहे महाग
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2023 10:03 AM2023-07-18T10:03:49+5:302023-07-18T10:05:14+5:30
Special Cadbury Chocolate: हे चॉकलेट 1902 मध्ये एका मुलीला शाळेत खास क्षणी दिलं होतं. तिने ते खाण्याऐवजी सांभाळून ठेवलं. तेव्हपासून तिच्या परिवारानेही ते सांभाळून ठेवलं.
Special Cadbury Chocolate: चॉकलेटचं नाव काढलं की, कुणाच्याही तोंडाला पाणी सुटतं. लोक रोज चॉकलेट खातात. पण आम्ही जर तुम्हाला सांगितलं की, एक 121 वर्ष जुन्या कॅडबरी चॉकलेटचा लिलाव केला जाणार आहे, तर तुमचा विश्वास बसणार नाही. बऱ्याच लोकांना तर हेही माहीत नसेल की, कॅडबरी इतकी जुनी कंपनी आहे. पण या स्पेशल चॉकलेटची कहाणी सुद्धा इंटरेस्टींग आहे. हे चॉकलेट 1902 मध्ये एका मुलीला शाळेत खास क्षणी दिलं होतं. तिने ते खाण्याऐवजी सांभाळून ठेवलं. तेव्हपासून तिच्या परिवारानेही ते सांभाळून ठेवलं.
1902 मध्ये इंग्लंडच्या किंग एडवर्ड VII आणि क्वीन एलेग्जेंड्राच्या राज्याभिषेकावेळी हे चॉकलेट बनवण्यात आलं होतं. त्यावेळी सहजपणे इतकं महाग चॉकलेट मिळत नव्हतं. त्यामुळे त्यावेळी 9 वर्षाची असलेल्या मेरी एन ब्लैकमोर हे मिळालं तर तिने ते खाण्याऐवजी सांभाळून ठेवलं. त्यामुळे आज त्याची किंमत जास्त आहे.
डेली मेलच्या रिपोर्टनुसार, हे व्हॅनिला चॉकलेट मेरीच्या परिवाराकडे दशकांपासून आहे. पण आता मेरीच्या नातीने या चॉकलेटचा लिलाव करण्याचं ठरवलं आहे. मेरीची मात जीन थॉम्पसन आता 72 वर्षांची झाली आहे. जीन हा चॉकलेटचा टिनचा डब्बा घेऊन हॅनसनच्या लिलाव करणाऱ्या संस्थेकडे गेली तेव्हा याबाबत माहिती समोर आली. याच्या डब्यावर किंग आणि क्वीनचा फोटोही आहे.
लिलाव करणारे मॉर्वेन फेयरली यांनी डेली मेलला सांगितलं की, चॉकलेटचा लिलाव हॅनसन्समध्ये केला जाईल आणि आशा आहे की, या चॉकलेटला कमीत कमी 100 ते 100 डॉलर म्हणजे 16 हजार रूपये किंमत मिळेल.
ते म्हणाले की, यापेक्षा जास्तही किंमत मिळू शकते. कारण कधी कधी लोक इतिहासातील एका तुकड्यासाठीही अपेक्षेपेक्षा जास्त किंमत देतात. पण हे यावर अवबंलून आहे की, ही वस्तू कोण घेत आहे. 121 वर्ष जुनं हे चॉकलेट आता एक्सपायर झालं आहे. ते खाण्यालायक नाही. पण डब्याचं झाकणं उघडताच त्यातून सुंगध येतो.