13 नंबरला का मानलं जातं अशुभ? जाणून घ्या यामागचं कारण...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2023 12:58 PM2023-11-14T12:58:22+5:302023-11-14T12:58:52+5:30

13 unlucky number : याचं नेमकं कारण जाणून घ्याल तर तुम्हाला कदाचित त्यांच्या भीतीचं कारण कळेल.

13 is considered unlucky number know reason behind it | 13 नंबरला का मानलं जातं अशुभ? जाणून घ्या यामागचं कारण...

13 नंबरला का मानलं जातं अशुभ? जाणून घ्या यामागचं कारण...

13 unlucky number : जगभरातील लोकांच्या वेगवेगळ्या मान्यता असतात. काही गोष्टींना ते शुभ मानतात तर काही गोष्टींना अशुभ. जसे की, भारतात मांजर आडवी गेली तर अशुभ मानलं जातं. तसेच जगभरात 13 नंबरला अशुभ मानलं जातं. पण यामागचं कारण काय आहे अनेकांना माहीत नाही. आज आपण तेच जाणून घेणार आहोत. 

जास्तकरून पाश्चिमात्य देशांमधील लोकांध्ये या 13 नंबरची भीती बघायला मिळते. पण याचं नेमकं कारण जाणून घ्याल तर तुम्हाला कदाचित त्यांच्या भीतीचं कारण कळेल. यातून आमचा तुम्हाला घाबरवण्याचा उद्देश अजिबात नाही. पण या 13 नंबरच्या काही मान्यता तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत.  

थर्टीन डिजीट फोबिया

काही रिपोर्ट्नुसार, 13 तारखेला अशुभ मानलं जातं कारण एकदा येशु ख्रिस्तांसोबत एका व्यक्तीने विश्वासघात केला होता. ही व्यक्ती येशुंसोबत रात्री जेवण करत होती आणि 13 नंबरच्या खुर्चीवर बसलेली होती. तेव्हापासून लोक या अंकाला अशुभ मानतात आणि तेव्हापासूनच लोक या अंकापासून दूर पळतात. मनोविज्ञानाने या 13 अंकाच्या भितीला ट्रिस्कायडेकाफोबिया किंवा थर्टीन डिजीट फोबिया असं नाव दिलं आहे. ही भीती लोकांमध्ये इतकी वाढली आहे की, लोकांनी या अंकाचा वापरच बंद केला आहे.

13 नंबरची ना इमारत ना हॉटेल रूम

जर तुम्ही परदेशात कधी फिरायला गेलात आणि हॉटेलमध्ये थांबल्यावर 13 नंबरची रूम, इमारतीत 13 वा मजला दिसला नाही तर समजून घ्या की,  मालक 13 अंकाला अशुभ मानतो. तुम्हाला अनेक लोक असेही दिसू शकतात जे हॉटेलमध्ये 13 नंबरची रूम घेणेही पसंत करत नाहीत. तसेच काही बार किंवा रेस्टॉरन्टमध्ये 13 नंबरचा टेबलही बघायला मिळत नाही. 

भारतात काय?

13 अंकाची भीती केवळ पाश्चिमात्य देशांमध्येच नाही तर भारतातही बघायला मिळते. इथेही अनेक लोक या अंकाला अशुभ मानतात. चंदीगड हे शहर देशातील सर्वात सुनियोजित शहर मानलं जातं. हे शहर पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या स्वप्नातील शहर होतं. पण अनेकांना हे माहीत नसेल की, या सुनियोजित शहरात सेक्टर १३ नाही. या शहराचा नकाशा तयार करणाऱ्या आर्किटेक्टने 13 नंबरचं सेक्टरच बनवलं नाही. तो 13 अंकाला अशुभ मानत होता. या आर्किटेक्टला परदेशातून बोलवण्यात आलं होतं.
 

Web Title: 13 is considered unlucky number know reason behind it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.