कोर्टात झाली 13 पोपटांची हजेरी अन् मालकाला घडली तुरुंगवारी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2019 07:20 PM2019-10-16T19:20:44+5:302019-10-16T19:25:25+5:30
कोर्टात आलेल्या पोपटांनी वेधलं अनेकांचं लक्ष
दिल्ली: पटियाला हाऊस कोर्टात आज चक्क पोपटांना हजर करण्यात आल्यानं अनेक जण चक्रावून गेले. न्यायालयाचं कामकाज सुरू असताना १३ पोपटांना आणण्यात आलं. त्यामुळे आाता पोपटांना शिक्षा होणार की काय, असा प्रश्न अनेकांच्या मनात आला. त्यामुळे न्यायालयात आणण्यात आलेले पोपट चांगलेच लक्षवेधी ठरले.
मंगळवारी (काल) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलानं दिल्लीतल्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका परदेशी व्यक्तीला अटक केली. त्याच्याकडे सुरक्षा दलाच्या जवानांना १३ पोपट सापडले. आरोपी या पोपटांना घेऊन उझबेकिस्तानमधील ताश्कंदला जात होता. त्यावेळी सुरक्षा दलाच्या जवानांना त्याचा संशय आला. यानंतर त्याला पक्ष्यांच्या तस्करी प्रकरणात ताब्यात घेण्यात आलं.
Delhi: 13 parrots, seized from possession of
— ANI (@ANI) October 16, 2019
an Uzbek national, at Indira Gandhi International Airport (IGI) Airport y'day, were presented before Patiala House Court today. The parrots have been sent to Okhla Bird Sanctuary & accused has been sent to judicial custody till Oct 30 pic.twitter.com/rQ1G8X9WOY
आज आरोपीसह १३ पोपटांना पटियाला हाऊस कोर्टात आणण्यात आलं. न्यायालयानं आरोपीला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी ठोठावली. आरोपी ज्युटच्या पाकिटांमधून अवैधपणे पोपटांना ताश्कंदला नेत होता. न्यायालयात सीमाशुल्क विभागाच्या वतीनं पी. सी. अगरवाल यांनी बाजू मांडली. वन्यजीव कायद्यानुसार प्राणी पक्ष्यांची खरेदी करण्यास बंदी असल्याचं त्यांनी सांगितलं.