१३ हजारांची रोकड, बँक कार्ड्ससह पाकिट हरवलं; ७ वर्षांनी पुन्हा सापडलं, पण...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2022 12:23 PM2022-04-26T12:23:54+5:302022-04-26T12:24:09+5:30

या पाकिटातून कुठलीही वस्तू गहाळ झाली नव्हती. त्यात जे सामान होते ते तसेच होते

13,000 cash, lost wallet with bank cards; Found again after 7 years | १३ हजारांची रोकड, बँक कार्ड्ससह पाकिट हरवलं; ७ वर्षांनी पुन्हा सापडलं, पण...

१३ हजारांची रोकड, बँक कार्ड्ससह पाकिट हरवलं; ७ वर्षांनी पुन्हा सापडलं, पण...

Next

एखादं पैशानं भरलेले पाकिट हरवलं तर ते पुन्हा भेटेल का? याबाबत शंकाच आहे. पण १, २ नव्हे तर तब्बल ७ वर्षांनी एका व्यक्तीला त्याचं हरवलेले पाकिट पुन्हा सापडलं आहे. या पाकिटात खूप पैसेही होते. आजही त्या पैशाच्या नोटा तशाच आहेत जसा ७ वर्षापूर्वी होत्या. एका टॅक्सीमध्ये पाकिटमध्ये हरवलं होतं. मात्र ७ वर्षांनी टॅक्सी ड्रायव्हरनं हे पाकिट पुन्हा परत करत एन्जॉय करा असं म्हटलं. मात्र हे पाकिट पाहून व्यक्ती हैराण झाला. त्याला कारणही अनोखं होतं.

ब्रिटनचे मॅनचेस्टरमध्ये ४५ वर्षीय एंडी एवेंस यांचे वॉलेट २०१५ मध्ये हरवलं होतं. एका कार्यक्रमाहून परतताना हे पाकिट टॅक्सीत राहिलं होते. त्यात ड्रायव्हिंग लायसन्स, बँक कार्ड्स आणि जवळपास १३ हजार रुपये होते. हरवलेले पाकिट आणि पैसे परत मिळणार नाहीत हे त्या व्यक्तीनं मनाला सांगितले होते. परंतु स्थानिक वृत्तानुसार, एंडीला काही दिवसांपूर्वी एक पार्सल मिळाले. हे पार्सल उघडून पाहताच त्यांना धक्का बसला. कारण या पार्सलमध्ये एंडीचं तेच ७ वर्षापूर्वी हरवलेलं पाकिट होते.

एंडीनं सांगितले की, या पाकिटातून कुठलीही वस्तू गहाळ झाली नव्हती. त्यात जे सामान होते ते तसेच होते. पाकिटात काही नोटा आणि सिक्केही होते परंतु त्याचा आता काहीच उपयोग नव्हता. कारण या नोटा चलनातून हद्दपार झाल्या आहेत. या प्रकारानं एंडी हैराण झाला असून त्याला अद्यापही ७ वर्षापूर्वी हरवलेले पाकिट सापडलं यावर विश्वास बसत नाही. ७ वर्ष, हे पाकिट पुन्हा मिळेल मी याचा कधी विचारही केला नव्हता. मात्र आज ते माझ्या हातात आहे असं एंडीने सांगितले.

एंडीला ज्या पार्सलमध्ये ते पाकिट सापडले. त्यावर एक ईमेल आयडी होता. ज्यामाध्यमातून एंडीने पाठवणाऱ्या व्यक्तीला धन्यवाद दिले आहेत. त्याचा रिप्लाय आला. ज्यात हे पाकिट एका जुन्या टॅक्सीत आढळलं होतं असं सांगितले. ईमेलला प्रत्युत्तर देताना पाठवणाऱ्या व्यक्तीने सांगितले की, ७ वर्ष अचंबित, हे पाकिट एका जुन्या टॅक्सीत सापडले. त्याला कुणीही हात लावला नाही. या पाकिटातील सगळ्या गोष्टी तशाच असतील अशी आशा आहे. बँकेत जाऊन जुन्या नोटा बदलून घ्या आणि एन्जॉय करा. ऑल दे बेस्ट. याला उत्तर देताना एंडीने प्रामाणिकपणा दाखवल्याबद्दल एक बक्षिस देण्याचं ठरवलं. परंतु त्याने ते घेण्यास नकार दिला.    

Web Title: 13,000 cash, lost wallet with bank cards; Found again after 7 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.