ऐकावं ते नवलच! १३०६ पायांचा जीव जमिनीच्या पोटात; जगातील पहिला मिलिपिड्स
By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2021 11:08 AM2021-12-20T11:08:56+5:302021-12-20T11:09:34+5:30
आजपर्यंत हजारो पायांचा मिलिपिड मिळाला नव्हता.
सिडनी: पहिल्यांदाच असा जीव सापडला आहे, की ज्याला १३०६ पाय असून तो जमिनीच्या आत खूप खोलवर राहतो. जगातील हा पहिला मिलिपिड्स असून, त्याने त्याचे नाव राखले आहे. आतापर्यंत जास्तीत जास्त ७५० पायांचा जीव शोधला गेला होता. परंतु या नव्या जीवाचा शोध लागल्यामुळे आधीचा शोध दुसऱ्या स्थानी आला आहे.
व्हर्जिनिया टेक युनिव्हर्सिटीचे एंटोमोलॉजिस्ट पॉल मारेक म्हणतात की, नेहमीच मिलिपिड शब्दाची थट्टा होत आली. मिलिपिड म्हणजे हजारो पाय. परंतु आजपर्यंत हजारो पायांचा मिलिपिड मिळाला नव्हता. या आधी १०० पायांचा मिलिपिड सापडत होते. त्यांना सेंटिपिड म्हणायचे. आतापर्यंत सर्वात जास्त ७५० पायांचा विक्रम इलाक्मे प्लेनिप्सच्या नावावर होता. हा जीवदेखील खूप खोल राहणारा आहे.
आता मिलिपिड्सची नवी प्रजाती मिळाली आहे. तिचे नाव युमिलिप्स पर्सेफोन असून, ते ग्रीक देवता ज्यूसची मुलगी पर्सेफोनच्या नावाने ठेवले गेले आहे. पर्सेफोनला पाताळातील देवता हेडेसने पळवून नेले होते.