महिलेने काठीने केला जोरदार हल्ला, मगरीच्या जबड्यातून पतीला जिवंत काढलं बाहेर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2024 09:34 AM2024-03-16T09:34:00+5:302024-03-16T09:34:34+5:30
दक्षिण आफ्रिकेत तीन मुलांचा पिता असलेला 37 वर्षीय एंथनी जोबर्ट मासे पकडण्यासाठी परिवारासोबत निघाला होता.
जर मगरीसारख्या एखाद्या जीवाने एखाद्या व्यक्तीला गिळलं तर त्याचं जिवंत वाचणं अवघड असतं. पण एक महिलेने तिच्या पतीला जवळपास अर्धा गिळलेल्या 13 फूट लांब मगरीच्या तावडीतून सोडवलं. जे थक्क करणारं आहे.
दक्षिण आफ्रिकेत तीन मुलांचा पिता असलेला 37 वर्षीय एंथनी जोबर्ट मासे पकडण्यासाठी परिवारासोबत निघाला होता. इथे एंथनीचा मुलगा जेपी एका डॅममध्ये मासे पकडण्याची दोरी टाकत होता. तेव्हा हुक कशालातरी अडकली. एंथनी ती हुक काढण्यासाठी पाण्यात उतरला.
एंथनीने सांगितलं की, इथे मगर लपून बसली असेल. अचानक ती पाण्यातून बाहेर आली आणि माझे पाय त्याने जबड्यात पकडले. तो मला पूर्ण गिळण्याचा प्रयत्न करत होता.
त्याने पुढे सांगितलं की, मला माझे पाय दिसत नव्हते. मी धडपडत होतो. फक्त तिचे दात मला दिसत होते. ची खोल पाण्यात मला खेचून घेऊन जात होती. खोल पाण्यात नेऊन तिने मला खाल्लं असतं. एखाद्या खेळण्यासारखं तिने मला पकडलं होतं. इतक्यात आमच्यासोबत आलेला माझा बॉस जोहान पाण्यात उतरला आणि माझ्या पॅंटची बेल्ट त्याने पकडली.
तो पुढे म्हणाला की, मगर आणि जोहान यांच्या माझ्या शरीराची ओढाताण सुरू होती. इतक्यात माझी पत्नी एनालिजे डॅममध्ये एक काठी घेऊन उतरली. तिने मगरीच्या डोक्यावर सतत वार केला आणि त्यानंतर मगरीने जबडा उघडला. त्यानंतर मगर पाण्यात निघून गेली.
जोहान वान डेर कोल्फ आणि एनालाइजने जखमी अवस्थेत मला पकडलं आणि पाण्यातून बाहेर काढलं. ब्लीडिंग रोखण्यासाठी त्यांनी टॉवेल लावले.
एंथनी पुढे म्हणाला की, मी मरणाऱ्या दारातून परत आलो होतो. मला एक वेळ असं वाटलं होतं की, माझी वेळ जवळ आली आहे. नशीब माझा मुलगा पाण्यात उतरला नाही. तर त्याची पत्नी एनालाइज म्हणाली की, मला नाही माहीत की, मी एंथनीला कसं वाचवलं. बस आम्ही ते केलं आणि ही घटना आम्ही आयुष्यभर विसरू शकणार नाही.