14 वर्षीय मुलाची बिटकॉइनमधून बंपर कमाई; दाखवले 9.5 कोटींचे कार कलेक्शन..
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2022 07:01 PM2022-11-13T19:01:12+5:302022-11-13T19:01:36+5:30
डिजिटल करन्सी असलेल्या बिटकॉइनने अनेक लोकांचे आयुष्य बदलले आहे.
डिजिटल करन्सी असलेल्या बिटकॉइनने अनेक लोकांचे आयुष्य बदलले आहे. बिटकॉइनने अल्पावधीत अनेकांना करोडपती केले आहे. अशातच एका 14 वर्षीय मुलानेही बिटकॉइनमधून कोट्यवधी रुपये कमावले आहेत. तुमचा विश्वास बसणार नाही, पण त्याने टिकटॉकवर त्याच्या आलिशान कारचे कलेक्शनही दाखवले आहे. त्याने बिटकॉइनच्या कमाईतून या गाड्या खरेदी केल्याचा त्याचा दावा आहे.
मलेशियातील हाजिक नासरी याने त्याच्या 40,000 फॉलोअर्सना त्याचे कारचे कलेक्शन दाखवले. तसेच, क्रिप्टोकरन्सीने त्याचे आयुष्य बदलल्याचे त्याने सांगितले. त्याच्या कार कलेक्शनमध्ये एक टोयोटा IQ आहे, जी त्याने 2018 मध्ये वयाच्या 10 व्या वर्षी खरेदी केली होती. याची किंमत अर्धा बिटकॉइन होती. याशिवाय, एक ब्लॅक रेंज रोव्हर स्पोर्ट त्याने 2020 मध्ये 12 वर्षांचा असताना खरेदी केली होती.
याशिवाय, त्याच्याकडे निळ्या रंगाची फेरारी FF - एक सुपरकारदेखील आहे. दरम्यान, सोशल मीडियावर अनेकांनी त्याच्या कार कलेक्शनवर प्रश्न उपस्थित केले आहेत. एका युजरने म्हटले की, 'तुझ्याबद्दल रांग किंवा तिरस्कार नाही, पण जर तू या वयात गाडी चालवू शकत नाहीस, तर एवढ्या महागड्या कार खरेदी का करत आहेस..?