ऐकावं ते नवलच! 15 वर्षांपासून ही वृद्ध महिला फक्त खडू खाऊनच जिवंत; खात नाही अन्न

By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2023 04:51 PM2023-09-01T16:51:33+5:302023-09-01T16:52:07+5:30

महिला गेल्या 15 वर्षांपासून नियमित जेवणाऐवजी खडूचे तुकडे खात आहे.

15 years this old woman is alive only by eating chalk does not eat food reason will surprise you | ऐकावं ते नवलच! 15 वर्षांपासून ही वृद्ध महिला फक्त खडू खाऊनच जिवंत; खात नाही अन्न

ऐकावं ते नवलच! 15 वर्षांपासून ही वृद्ध महिला फक्त खडू खाऊनच जिवंत; खात नाही अन्न

googlenewsNext

तेलंगणातील राजन्ना सिरसिल्ला जिल्ह्यातील मुस्ताबाद मंडलातील बदनाकल गावातील मल्लव्वा ही वृद्ध महिला गेल्या 15 वर्षांपासून नियमित जेवणाऐवजी खडूचे तुकडे खात आहे. तिला पाहून आजूबाजूचे सर्वजण आश्चर्यचकित झाले. ही वृद्ध महिला सर्वांसाठी कुतूहलाचा विषय आहे. या महिलेच्या आयुष्यात हा बदल 15 वर्षांपूर्वी आला जेव्हा ती शेतात काम करून जेवण्यासाठी घरी परतत होती. 

महिलेने आपल्या ताटात अन्न घेतलं आणि ती जेवायला निघाली असतानाच तिला तिच्या ताटात बरेच किडे दिसू लागले आणि तिने त्यानंतर जेवणं बंद केलं. ती रिकाम्या पोटी झोपली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठून तिचा दिनक्रम सुरू केला. पण पुन्हा तोच अनुभव आला जेव्हा तिने नियमित जेवण्याचा प्रयत्न केला तेव्हा पुन्हा तसंच घडलं. तिने अन्न सोडलं. यानंतर तिला खडूचे तुकडे सापडले.

खडूच्या कॅल्शियम, कार्बन आणि ऑक्सिजन असलेल्या तुकड्यांनी महिलेने आपली भूक भागवली. नंतर विहिरीतून पाणी घेऊन ते प्यायली. तेव्हापासून तिने खडूचे तुकडे खायला सुरुवात केली आणि नियमित अन्न आणि शुद्ध पाणी किंवा बोअरवेलच्या पाण्याऐवजी विहिरीचे पाणी पिण्यास सुरुवात केली. यानंतर महिलेने सांगितलं की, मी सामान्य अन्न खाण्याचा प्रयत्न केला आणि काही प्रमाणात खाल्ले, पण काही तासांतच मला पोटदुखी होऊ लागली.

खडूचे तुकडे आणि विहिरीचे पाणी पिण्यास सुरुवात केली. हे पाहून डॉक्टर आश्चर्यचकित झाले असून त्यांच्या मते ही अत्यंत दुर्मिळ गोष्ट आहे. 'मी यापूर्वी अशी प्रकरणे पाहिली नाहीत. आम्हाला अल्ट्रासाऊंडसारख्या योग्य चाचण्यांसह परिस्थितीचे विश्लेषण करावे लागेल. जर ती स्त्री फक्त खडूच्या सहाय्याने जगत असेल तर तो नक्कीच चमत्कार आहे. वेमुलवाडा सरकारी सेक्टर हॉस्पिटलचे डॉक्टर महेश राव यांनी ही माहिती दिली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
 

Web Title: 15 years this old woman is alive only by eating chalk does not eat food reason will surprise you

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.