अल्पवयीन मुलीने दिला बाळाला जन्म, म्हणते आई, आज्जी अन् बहिणही १७व्या वर्षीच प्रेग्नेंट झाल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2022 03:56 PM2022-03-13T15:56:36+5:302022-03-13T16:00:48+5:30

अल्पवयीन वयातच ती मुद्दामहून आई बनली. या वयात प्रेग्नंट होण्याचा तिने निर्णय घेतला आणि एका बाळालाही जन्म दिला. अल्पवयीन मुलीच्या या प्रेग्नन्सीच्या बातमीने सर्वांनाच धक्का दिला.

17 year old girl gives birth to child says her mother, sister and grand mother became mothers before 20 of their age | अल्पवयीन मुलीने दिला बाळाला जन्म, म्हणते आई, आज्जी अन् बहिणही १७व्या वर्षीच प्रेग्नेंट झाल्या

अल्पवयीन मुलीने दिला बाळाला जन्म, म्हणते आई, आज्जी अन् बहिणही १७व्या वर्षीच प्रेग्नेंट झाल्या

googlenewsNext

वय वर्षे १७... ऐन तारुण्याच्या उंबरठ्यावर असलेली अल्पवयीन मुलगी. पण आई होण्यासाठी तिने तरुण होण्याचीही प्रतीक्षा केली नाही. अल्पवयीन वयातच ती मुद्दामहून आई बनली. या वयात प्रेग्नंट होण्याचा तिने निर्णय घेतला आणि एका बाळालाही जन्म दिला. अल्पवयीन मुलीच्या या प्रेग्नन्सीच्या बातमीने सर्वांनाच धक्का दिला (17 year old girl become mother).

आई होणं प्रत्येक महिलेसाठी एक आनंदाचा क्षण असतो. पण तरी ती तितकीच मोठी जबाबदारी असते. त्यामुळे आपण ही जबाबदारी आता घेऊ शकतो याची खात्री झाल्यानंतर महिला प्रेग्नंट होण्याचा निर्णय घेतात. प्रेग्नन्सीला घाबरणाऱ्या काही महिला तर उशिरानेच प्रेग्नंट होण्याचा विचार करतात. पण ही मुलगी वयाच्या १७ व्या वर्षातच प्रेग्नंट झाली (What is right time to become mother). द सनच्या रिपोर्टनुसार १७ वर्षांची शॅनन (Shannon) या टिकटॉकरने आपल्या टिकटॉक अकाऊंटवर हा एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात तिने आपल्या वैयक्तिक आणि कौटुंबिक आयुष्याबाबत काही शॉकिंग खुलासे केले आहेत.

तिने सांगितलं, तिच्या आजीने १६ व्या वयात मुलाला जन्म दिला होता. तिची आईने १८ व्या वयात आणि बहीण १९ व्या वयात प्रेग्नंट झाली होती. वयाच्या २१ व्या वर्षाच्या आधीच सर्व महिला आई बनल्या होत्या त्यामुळे त्यांच्या ५ पिढ्या आजही जिवंत आहेत.  तिच्या आईची आई जिचं वय सर्वात जास्त ९१ वर्षे आहे. लवकर आई होण्याचा हाच फायदा आहे की मुलांना वयस्कर व्यक्तींची साथही बराच काळ लाभते. शॅननचा हा व्हिडीओ पाहून तिचे हे विचार ऐकून काहींनी तिच्या या निर्णयाचं समर्थन केलं आहे. तर काहींनी हे वय प्रेग्नन्सीसाठी योग्य नसल्याचं म्हटलं आहे.

Web Title: 17 year old girl gives birth to child says her mother, sister and grand mother became mothers before 20 of their age

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.