वॅक्सिंग करायला गेली १७ वर्षाची युवती, पार्लवालीने सांगितलं धक्कादायक सत्य!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2022 05:00 PM2022-04-04T17:00:06+5:302022-04-04T17:05:02+5:30
ऑस्ट्रेलियातील एका महिलेने टिकटॉकवर (Australian Woman waxing experience) शेअर केलेला तिचा वॅक्सिंगचा अनुभव शेअर केला असून तो व्हायरल झाला आहे. मात्र, त्याचं कारण अतिशय वेगळं आहे.
महिला किंवा पुरूष गरम मेणाच्या मदतीने त्वचेवरील बारीक बारीक केस काढतात. याला वॅक्सिंग म्हणतात. केस काढण्याची ही प्रक्रिया अत्यंत वेदनादायी असते. त्यामुळे बऱ्याच महिलांना वॅक्सिंगचा (Waxing experience) पहिला अनुभव चांगलाच लक्षात राहतो. हा अनुभव कित्येक महिला सोशल मीडियावरही शेअर करतात. ऑस्ट्रेलियातील एका महिलेने टिकटॉकवर (Australian Woman waxing experience) शेअर केलेला तिचा वॅक्सिंगचा अनुभव शेअर केला असून तो व्हायरल झाला आहे. मात्र, त्याचं कारण अतिशय वेगळं आहे.
द सन या वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार, लॉरा नावाच्या एका महिलेचा हा व्हिडिओ आहे. क्रिम्पीटोसेस (Crimpytoses) नावाच्या टिकटॉक अकाउंटवरून तिने हा व्हिडिओ शेअर केला आहे. पहिल्यांदाच ब्राझिलियन वॅक्सिंग करायला गेल्यानंतर पार्लरवाल्या महिलेने कशी धक्कादायक गोष्ट महिला (Australian Found She Was Pregnant While doing Bikini Waxing) सांगितली होती, याबाबत हा व्हिडिओ आहे. लॉरा म्हणते की, त्या महिलेने दिलेल्या माहितीमुळे तिचं आयुष्यच बदललं.
लॉरा सांगते, की १७ वर्षांची असताना ती ब्राझिलियन बिकिनी व्हॅक्स (Brazilian bikini waxing) करण्यासाठी पार्लरमध्ये गेली होती. त्यावेळी ती खूप लाजत होती. ब्राझिलियन वॅक्सिंगमध्ये शरीराच्या खासगी भागातील केसही काढले जातात. यावेळी आपला स्कर्ट न काढता वॅक्सिंग करण्याची विनंती तिने पार्लरवाल्या महिलेला केली. त्या महिलेने ही विनंती मान्य केली.
वॅक्सिंगला सुरुवात करताच लॉराला (Laura) मोठ्या प्रमाणात वेदना होऊ लागल्या. वॅक्सिंगसाठी वापरण्यात येणारे मेण खूपच गरम असल्याची तक्रार ती करू लागली. मात्र, आतापर्यंत बऱ्याच वेळा वॅक्सिंग केलेल्या पार्लरवाल्या महिलेला खात्री होती, की मेण तेवढे गरम नाही. मात्र तरीही लॉराची तक्रार सुरूच राहिली. यानंतर महिलेने लॉराला विचारले, की तू प्रेग्नंट आहेस का? हे ऐकून लॉरा थक्क झाली. तिने तेव्हा लगेच “नाही” असं उत्तर दिलं. मात्र, घरी गेल्यानंतर तिच्या लक्षात आलं की तिची एक पाळी चुकली आहे. तिने गर्भनिदान चाचणी केल्यानंतर ती खरोखरच प्रेग्नंट (Beautician Found Pregnancy Of Client While Waxing) असल्याचं स्पष्ट झालं.
लॉराने पार्लरवाल्या महिलेला तेव्हाच विचारलं होतं, की तुम्ही असा प्रश्न का विचारला? तेव्हा तिने सांगितलं, “जास्त गरम नसणारे व्हॅक्सही लॉराला गरम लागत होतं. म्हणजेच तिचं शरीर कमकुवत झालं होते. त्यामुळेच ती प्रेग्नंट असल्याचा संशय (Beautician Guessed Pregnancy While Waxing) मला आला.” केवळ या गोष्टीवरून अचूक अंदाज बांधलेला पाहून लॉराला आश्चर्याचा धक्का बसला होता.
लॉराचा हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत असून, त्यावर इतर महिलादेखील आपले वॅक्सिंगचे आणि आपल्याला प्रेग्नंसीबाबत कसे समजले, याचे विविध अनुभव शेअर करत आहेत.