ना लॉटरी, ना बक्षीस, घरात बसून लखपती बनला हा मुलगा; वाचा कसं बदललं त्याचं नशीब?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2022 06:25 PM2022-04-20T18:25:06+5:302022-04-20T18:39:24+5:30

Success Story : या मुलाने लाखो रूपयांची कमाई केली आणि केवळ १८ महिन्यात २० लाख रूपये कमावले. यावर कदाचित कुणाला सहजपणे विश्वास बसणार नाही, पण हे सत्य आहे. चला जाणून घेऊ हे कसं झालं...

17 years old boy become millionaire in UK from house | ना लॉटरी, ना बक्षीस, घरात बसून लखपती बनला हा मुलगा; वाचा कसं बदललं त्याचं नशीब?

ना लॉटरी, ना बक्षीस, घरात बसून लखपती बनला हा मुलगा; वाचा कसं बदललं त्याचं नशीब?

googlenewsNext

Success Story : आपण नेहमीच ऐकत असतो की, कधी कुणाचं नशीब कसं बदलेल काही सांगता येत नाही. अनेकदा टॅलेंट असूनही लोकांना हवं तसं यश मिळत नाही आणि ते लोक नशीबाला दोष देतात. पण एका मुलाने आपल्या टॅलेंटच्या माध्यमातून आपलं नशीब असं काही बदललं ज्याची कल्पना त्यानेही केली नसेल. तेव्हाच बेडरूममध्ये बसल्या बसल्या या मुलाने लाखो रूपयांची कमाई केली आणि केवळ १८ महिन्यात २० लाख रूपये कमावले. यावर कदाचित कुणाला सहजपणे विश्वास बसणार नाही, पण हे सत्य आहे. चला जाणून घेऊ हे कसं झालं...

मूळचा बर्मिंघमला राहणाऱ्या १७ वर्षीय या मुलाचं नाव आहे सॅम बेजर. त्याला ना कोणती लॉटरी लागली ना काही बक्षीस मिळालं. त्याने त्याच्या टॅलेंटच्या जोरावर घरात बसून लाखो रूपये कमाई केली. असं सांगितलं जात आहे की, सॅमने २० लाख रूपयांची कमाई फोन केस विकून केली.  

सॅमने त्याच्या बिझनेसचं नाव 'On The Case 4U' ठेवलं आहे. आता तर सगळीकडे सॅमची चर्चा होत आहे. पण त्याचा हा प्रवास सोपा नव्हता. सॅमला ऑटिज्म आजार आहे. बालपणापासूनच सॅमला वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागला. शाळेत विद्यार्थी आणि शिक्षकही त्याला ढ समजत होते. 

सॅमची आई हन्ना म्हणाली की, त्याने बऱ्याच दु:खांचा सामना केला. पण तिला तिच्या मुलावर विश्वास आहे. सॅमला सुरूवातीपासून काहीतरी वेगळं करायचं होतं. त्यामुळे त्याने आधी साध्या फोनसाठी कवर्स खरेदी केले आणि त्यावर आपल्या प्रिटिंग प्रेसच्या मदतीने डिवाइंसवर ट्रान्सफर करत होता.

सॅमच्या आईने सांगितलं की, हळूहळू त्याने काम वाढवणं सुरू केलं आणि ऑनलाईन फोन कवर्स तयार करणं शिकून घेतलं. काही महिन्यांच्या रिसर्चमध्ये त्याने कवर्स विकण्यावर फोकस केला. सध्या तो आठवड्यातून ५० फोन कवर ऑनलाईन विकतो. तेच यूकेमध्ये अनेक शॉपिंग मॉल्समध्ये वेंडिंग मशीनच्या माध्यमातून फोन कवर विकले जात आहे. त्यासोबतच सोशल मीडियाच्या माध्यमातूनही सॅम बिझनेस वाढवत आहे. या कामासाठी सॅमने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. लोक त्याचं कौतुक करत आहे.
 

Web Title: 17 years old boy become millionaire in UK from house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.