कमाल! जगातील सगळ्यात जुनं अंड जे 1700 वर्षानंतरही आहे चांगलं, बघा फोटो!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2024 11:11 AM2024-02-13T11:11:48+5:302024-02-13T11:12:39+5:30
स्कॅन केल्यावर समजलं की, ते पूर्णपणे सुरक्षित आहे. इतक्या वर्षापासून सुरक्षित असलेल्या या अंड्याने सगळ्यांनाच अवाक् केलं आहे.
जर तुम्हाला विचारलं गेलं की, जगातील सगळ्यात जुनं अंड किती वर्ष जुनं असू शकतं? तर तुम्ही यावर काय उत्तर द्याल. कुणी 100 वर्ष म्हणतील तर कुणी 200 वर्ष पण हे बरोबर उत्तर नसेल. कारण आता जगातील सगळ्यात जुनं म्हणजे 1700 वर्ष जुनं अंड सापडलं आहे. आश्चर्याची बाब म्हणजे हे अंड पूर्णपणे सुरक्षित आहे.
इंग्लंडमध्ये एका प्राचीन वास्तुमध्ये खोदकाम सुरू होतं. तिथे हे अंड सापडलं. जे स्कॅन केल्यावर समजलं की, ते पूर्णपणे सुरक्षित आहे. इतक्या वर्षापासून सुरक्षित असलेल्या या अंड्याने सगळ्यांनाच अवाक् केलं आहे.
इंग्लंडच्या बकिंघमशायरमध्ये ऐलिसबरीच्या बेरीफील्डमध्ये सापडलेल्या या रोमन युगातील अंड्याच्या आत आजही तरल पिवळा आणि पांढरा भाग कायम आहे. हे स्कॅन करण्यात आलं तेव्हा समजलं की, हे अंड 1700 वर्ष जुनं आहे. हे अंड पाण्याने भरलेल्या एका खड्ड्यात सापडलं.
असं मानलं जात आहे की, याच कारणाने हे अंड इतकी वर्ष सुरक्षित राहिलं. जेव्हा हे अंड स्कॅन केलं तेव्हा त्यांना दिसलं की, अंड आतून सुरक्षित आहे. डीजीबी कंजरवेशनच्या पुरातत्ववादी डॅना गुजबर्न ब्राउन म्हणाल्या की, या अंड्याच्या आत हवेचा एक बुडबुडाही आहे.
या बुडबुड्यामुळेच त्यांना समजलं की, आत तरल पदार्थ कायम आहे. त्यांना दिसलं की, अंड हलवलं तर त्यातील बुडबुडाही हलतो. या ठिकाणी अशी चार अंडी सापडली आहेत. पण यातील तीन खोदकाम करताना फुटली. याआधीही अशा ठिकाणांवर अंडी सापडली. पण पहिल्यांदाच असं सुरक्षित अंड सापडलं.
गुडबर्न ब्राउन म्हणाल्या की, अशाप्रकारच्या अंड्यामध्ये जैविक पदार्थही इतका काळ कामय राहू शकत नाही. पण हे फार अजब आहे. असं मानलं जात आहे की, कुणीतरी अंड फार चांगल्याप्रकारे एका बास्केटमध्ये ठेवलं होतं. रोमन समाजात अंड्याला फार महत्व होतं.