"ना मिलो हमसे ज्यादा..." ५५ वर्षीय फारुखच्या प्रेमात पडली १८ वर्षीय मुस्कान
By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2022 07:11 PM2022-08-27T19:11:43+5:302022-08-27T19:13:43+5:30
या प्रेमी युगलाची मुलाखत एका चॅनेलवर घेण्यात आली त्यात त्यांनी बिनधास्त उत्तरं दिली.
पाकिस्तानात राहणाऱ्या १८ वर्षीय मुलीचा ५५ वर्षीय फारूख यांच्यावर जीव जडला आहे. या मुलीचं नाव मुस्कान आहे. सध्या फारूख-मुस्कान यांच्या नात्याबद्दल विविध चर्चा सुरू आहेत. मुस्कानच्या गाण्यानं प्रभावित होऊन मी तिच्या जवळ गेलो असं फारूख यांनी म्हटलं. तर फारूख यांच्या बोलण्याच्या स्टाईलवर मी फिदा झाले असं मुस्काननं सांगितले.
या प्रेमी युगलाची मुलाखत एका चॅनेलवर घेण्यात आली त्यात त्यांनी बिनधास्त उत्तरं दिली. यूट्यूबर सैयद बासित अलीला दिलेल्या मुलाखतीत फारूख म्हणाले की, मुस्कान माझ्या घराशेजारीच राहते. तिला गाणे गायला खूप आवडते. त्यामुळे मी तिच्या घरी येऊन जाऊन असे. हळूहळू मुस्कान मला पाहू लागली. आमच्यात बोलणे झाले. सुरुवातीला मला तिच्यावर प्रेम होऊ लागलं. त्यानंतर तिने तिच्या मनातलं मला सांगितले.
जेव्हा आम्ही दोघं रिलेशनमध्ये आलो तेव्हा घरचे, मित्र-परिवार, नातेवाईक यांनी सुनावलं. परंतु कुणाचीही पर्वा न करता आम्ही एकमेकांसोबत घट्ट राहिलो. मुलाखतीत मुस्कान म्हणते की, जेव्हा फारूख माझ्या घरी येत होते तेव्हा मी नेहमी ना मिलो हमसे ज्यादा कही प्यार हो ना जाए हेच गाणे गुणगणत असायची. फारूखचा अंदाज, स्टाईल, स्वभाव खूप आवडला. त्यानंतर इश्कवाला प्यार झाला असं मुस्काननं म्हटलं.
त्याचसोबत फारूखसाठी मी काहीही करू शकते. माझा जीवही देऊ शकते असं मुस्कानने सांगितले. फारूखही मुस्कानसाठी काहीही करण्यास तयार आहेत. मुस्कानसारखी मुलगी माझ्या आयुष्यात आली हा वरच्याच आशीर्वाद आहे. फारूखचं हे पहिलं लग्न आहे. आतापर्यंत फारूख अविवाहित होते. परंतु वयाच्या ५५ व्या वर्षी फारूख यांना मुस्कान मिळाली आणि दोघेही लग्न करणार आहेत.