१८व्या शतकातील सुंदर किटलीचा लिलाव, मिळालेली किंमत वाचून उडेल झोप
By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2021 04:54 PM2021-11-03T16:54:38+5:302021-11-03T16:58:00+5:30
ही पहिल्या महायुद्धानंतर लंडनच्या एका डीलरकडून एका अधिकारी आणि त्याच्या पत्नीने १९२५ मध्ये खरेदी केली होती.
इतिहासातून ज्या वस्तू समोर येतात. त्या बघितल्यावर त्या आपल्याजवळ ठेवण्यासाठी आणि बघण्यासाठी अनेक लोक उत्साही असतात. एक अशीच किंमती चहाची किटली सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. १८ व्या शतकात तयार केलेली ही किटली निळ्या रंगाची आहे आणि याचा नुकताच लिलाव करण्यात आला.
या ऐतिहासिक किटलीची नुकतीच लिलावात विक्री करण्यात आली. यात या किटलीला २ मिलियन डॉलर म्हणजे २० कोटी ३० लाख रूपये किंमत मिळाली आहे. असं सांगितलं जात आहे की, ही चहाची कॅटली १७४० मध्ये तयार करण्यात आली होती आणि ही चीनचे तत्कालीन राजा क्वियानलॉन्ग यांनी तयार करून घेतली होती. ही पहिल्या महायुद्धानंतर लंडनच्या एका डीलरकडून एका अधिकारी आणि त्याच्या पत्नीने १९२५ मध्ये खरेदी केली होती. या किटलीची किंमत ८ कोटी रूपये ठेवण्यात आली होती. पण नंतर याची बोली वाढली.
The Sun च्या रिपोर्टनुसार, किटली ६ इंच रूंद आहे आणि ब्रॉन्झपासून तयार केली आहे. अशाच काही किटली ताइपेई, तायवान आणि अमेरिकेतील म्युझिअममध्ये आहेत. लिलावात किटलीची सुरूवातीची किंमत ८ कोटी रूपये ठेवण्यात आली होती. पण हळूहळू ही किंमत चढत १७ कोटी २४ लाख ९४ हजार रूपयांच्या वर गेली. अखेर याची किंमत २० कोटी ३० लाख रूपये ठरली.
असं सांगितलं जात आहे की, किटली Far East कलेक्टरकडून खरेदी करण्यात आली आहे. ही किटली चीनच्या इतिहासाची साक्षीदार आहे. त्यामुळे ती त्यांनी परत मिळवली. किटलीवर डोंगर आणि तलावांचे चित्र आहे. तसेच काही फुलपाखरे आणि फुलांच्याही कलाकृती आहे.