गायक गुरू रंधावाची फॅन लग्नाच्या १५ दिवसाआधी झाली फरार, वाचा काय आहे भानगड
By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2021 02:29 PM2021-06-25T14:29:27+5:302021-06-25T14:34:52+5:30
याप्रकरणी तरूणीच्या वडिलांनी पोलिसात तक्रार दिली आहे आणि म्हणाले की, तरूणी तिच्यासोबत पन्नास हजारांपेक्षा जास्त रक्कम आणि दागिने घेऊन गेली आहे.
सामान्यपणे तरूण-तरूणी तेव्हाच घरातून पळून जातात जेव्हा दोन्ही परिवार त्यांच्या विरोधात असतात. मात्र, हिमाचल प्रदेशच्या हमीरपूरमधून तरूणीच्या फरार होण्याची एक अजब घटना समोर आली आहे. एका रिपोर्टनुसार, लग्नाच्या पंधरा दिवसांआधी तरूणी घरातून पळून गेली आणि सोबतच काही रक्कम व दागिने घेऊन गेली. पोलीस तरूणीचा शोध घेत आहेत. पण त्यांना काहीही पुरावा हाती लागला नाही. गुरू रंधावा नावाच्या तरूणावर तरूणीला पळवून नेल्याचा आरोप आहे.
याप्रकरणी तरूणीच्या वडिलांनी पोलिसात तक्रार दिली आहे आणि म्हणाले की, तरूणी तिच्यासोबत पन्नास हजारांपेक्षा जास्त रक्कम आणि दागिने घेऊन गेली आहे. त्यांनी हेही सांगितलं की, काही दिवसांपूर्वीच त्यांच्या मुलीचं लग्न ठरलं होत. लग्न ठरल्यावर मुलगी आनंदीही होती. तसेच तिच्या आई-वडिलांनी हेही सांगितलं की, जेव्हा त्यांची मुलगी घरातून गेली तेव्हा ती तीन-चार बॅग घेऊन गेली. तरूणीला घरातून पळून जाताना काही लोकांनी पाहिलं होतं. ज्यानंतर पोलिसात तक्रार देण्यात आली. (हे पण वाचा : १६ वर्षीय विद्यार्थ्याच्या प्रेमात वेडी झाली महिला शिक्षिका; त्यानंतर जे काही केलं, प्रकरण थेट कोर्टात पोहचलं)
या केस इंटरेस्टींग वळण तेव्हा आलं जेव्हा समोर आलं की, ही तरूणी स्वत:ला पंजाबी गायक गुरू रंधावाची सर्वात मोठी फॅन मानते. ट्विटरवरही तरूणीने पंजाबी गायक गुरू रंधावाचे ट्विट रिट्विट केले होते. तरूणीच्या वडिलांनी सांगितलं की, त्यांच्या दुसऱ्या मुलींनी सांगितलं की, तरूणीची ट्विटर अकाऊंटवर एका तरूणासोबत ओळख झाली होती. तो स्वत:ला गुरू रंधावा खास असल्याचं सांगत होता. अशात घरातील लोकांना संशय आहे की, तरूणी याच तरूणाला भेटण्यासाठी पळून गेली आहे. सध्या याप्रकरणी स्पष्टपणे काही समोर आलेलं नाही. पोलीस चौकशी करत आहेत.
अतिरिक्त पोलीस अधिक्षक हमीरपूर विजय सकलानी म्हणाले की, आमच्याकडून योग्य ती चौकशी करत आहोत. घरातून जात असताना तरूणीने एक नोटही लिहून ठेवली होती. ज्यात तिने लिहिले होते की, ती घर सोडून जात आहे. ही नोट मिळाल्यावर शनिवारी याची माहिती पोलिसांना दिली गेली होती. सध्या ही घटना परिसरात चर्चेचा विषय ठरत आहे. पण तरूणीबाबत ठोस असा काहीच पत्ता लागला नाही.