लग्न मोडून दोन कपलने घेतला घटस्फोट, चौघेही सोबत राहू लागले; पार्टनर आणि पैसेही करतात शेअर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2023 15:25 IST2023-03-21T15:25:11+5:302023-03-21T15:25:33+5:30

दोघेही जेव्हा 20 वर्षांचे होते तेव्हा त्यांची भेट झाली आणि नंतर त्यांनी लग्न केलं. हळूहळू त्यांना जाणीव झाली की, ते दोघेही समलैंगिक आहे. त्यांना पुरूष आणि महिला दोघांमध्येही इंटरेस्ट आहे.

2 couple divorce and start living together polyamory relationship share partners with each other | लग्न मोडून दोन कपलने घेतला घटस्फोट, चौघेही सोबत राहू लागले; पार्टनर आणि पैसेही करतात शेअर

लग्न मोडून दोन कपलने घेतला घटस्फोट, चौघेही सोबत राहू लागले; पार्टनर आणि पैसेही करतात शेअर

जसजसा समाज विकसित होत आहे, नात्यांची भाषाही बदलत आहे. आधीची नात्यांची परिभाषा वेगळी होती. एक काळ असाही होता की, राजे-महाराजांच्या समाजात एक महिलेचे अनेक पती असायचे किंवा पुरूषांना अनेक पत्नी असायच्या. नंतर एकच लग्न करण्याची प्रथा वाढू लागली. पण परदेशात असं वाटतं ही जुनी प्रथा पुन्हा येत आहे. परदेशात नव्या पद्धतीची नाती जन्माला येत आहेत. आता केवळ दोन लोक लग्नात सामिल नसतात तर अनेक असतात.

यूनीलॅंड वेबसाइटच्या रिपोर्टनुसार ही अनोखी घटना अमेरिकेत बघण्यात आला आहे. रेशिअल आणि कायल राइट नावाचे पती-पत्नी न्यूयॉर्कमध्ये राहत होते. 34 वर्षीय रेशिअल एक मॅरेज थेरपिस्ट आहे. तिने एका वेबसाइटसोबत बोलताना सांगितलं की, कशी ती आणि तिचा पॉलीगॅमी (polygamy) चा भाग झाले. पॉलिगॅमीचा अर्थ होतो एकापेक्षा जास्त पार्टनर्स असणं.

दोघेही जेव्हा 20 वर्षांचे होते तेव्हा त्यांची भेट झाली आणि नंतर त्यांनी लग्न केलं. हळूहळू त्यांना जाणीव झाली की, ते दोघेही समलैंगिक आहे. त्यांना पुरूष आणि महिला दोघांमध्येही इंटरेस्ट आहे. नंतर दोघांनी 2019 मध्ये एकमेकांना नव्या पार्टनर्ससोबत डेटिंग करण्याचं स्वातंत्र्य दिलं. कोरोना काळादरम्यान दोघांची भेट एक विवाहित कपल यैर लेंकनर आणि एशली गिडेन्ससोबत झाली. चौघेही सोबत वेळ घालवू लागले आणि 18 महिने डेटिंग केल्यानंतर त्यांनी सगळ्यांनी सोबत राहण्याचा निर्णय घेतला. 

सोबत राहत असताना दोन्ही महिलांनी ठरवलं की, त्या आपापल्या पतींना घटस्फोट देतील आणि चौघेही सिंगल असल्यासारखे एका छताखाली राहतील. याने चौघांचा खर्च कमी होत होता. त्यांचं सेव्हिंगही होऊ लागलं होतं. त्यांनी सगळा खर्च वाटून घेतला होता. सोबतच आपापले पार्टनर्सही शेअर करू लागल्या.

अशात काही दिवसांआधी रेशिअलने इन्स्टावर पोस्ट करून सांगितलं होतं की, तिचा एक्स पती कायल आता या नात्यात नाहीये. कारण तो या फिट होऊ शकत नव्हता. त्याला त्याची वेगळी ओळख हवी आहे. पण त्यांचं हे वेगळं होणं काही दिवसांसाठीच आहे.

Web Title: 2 couple divorce and start living together polyamory relationship share partners with each other

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.