दोन महिलांनी एकाच तरूणावर केला आपला पती असल्याचा दावा, भर चौकात घातला गोंधळ!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2023 09:27 AM2023-06-19T09:27:13+5:302023-06-19T09:28:01+5:30
Marriage Viral News: एक फूल दो माली ही हिंदीतील म्हण तर तुम्ही ऐकली असेलच. पण एक माली आणि दोन फूल असं कधी ऐकलं नसेल.
Marriage Viral News: झारखंडच्या झुमरी तलैयाच्या एका चौकात एका तरूणावर दोन महिलांनी तो त्यांचा पती असल्याचा दावा केला आहे. यावरून इथे झालेल्या गोंधळानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचली होते. त्यानंतर त्याना पोलीस स्टेशनला नेण्यात आलं. एक फूल दो माली ही हिंदीतील म्हण तर तुम्ही ऐकली असेलच. पण एक माली आणि दोन फूल असं कधी ऐकलं नसेल. भर चौकात तिघांचा वाद सुरू झाला आणि लोकांची एकच गर्दी जमली. तेव्हा लोकांना समजलं की, दोन महिला एकाच तरूणावर त्यांचा पती असल्याचा दावा करत होत्या.
तरूणाचे वडील बच्चू राम यांनी सांगितलं की, 2015 मध्ये त्यांचा मलगा संदीप राम याने डोमचांच इथे राहणाऱ्या गुडिया देवीसोबत प्रेमविवाह केला होता. ज्यातून त्यांना तीन मुलंही झाली. पण एका दुसऱ्या महिलेने दावा केला की, संदीपने तिच्यासोबतही लग्न केलं. तेच संदीपची पहिली पत्नी गुडिया देवी म्हणाली की, तिने परिवार आणि समाजाविरोधात जाऊन संदीपसोबत प्रेमविवाह केला होता. दोघे आनंदाने संसार करत होते.
तर संदीप हा मुंबईतील एका हॉटेलमध्ये काम करतो. तीन दिवसाआधी तिचा पती जेव्हा मुंबईहून परत आला तेव्हा पूजाला आपल्या सोबत घेऊन आला. इथे आल्यावर संदीप म्हणाला गुडिया आणि पूजाला त्याला एकत्र रहायचं आहे.
पतीच्या या वागण्यावर गुडिया संतापली आणि याच कारणाने गावातील चौकात तिघांचं भांडण सुरू झालं होतं. शेवटी पोलीस आले आणि त्यांना सोबत घेऊन गेले. पोलीस पुढील चौकशी करत आहेत.