बॉयफ्रेंडने दिला धोका! पुन्हा चॅट करण्यासाठी चार्ज करते भरमसाठ फी, इतकी की पुन्हा चूक करेल तर शप्पथ!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2021 19:09 IST2021-09-03T18:03:18+5:302021-09-03T19:09:11+5:30
काहीजण प्रेमाच्या या नात्यात विश्वासघात करतात अन् त्यांना नंतर पश्चाताप होतो पण तेव्हा वेळ निघुन गेलेली असते. एका तरुणीनं मात्र तिच्या प्रियकराला याची अशी काही शिक्षा दिली की तो अजुनही पश्चाताप करत आहे.

बॉयफ्रेंडने दिला धोका! पुन्हा चॅट करण्यासाठी चार्ज करते भरमसाठ फी, इतकी की पुन्हा चूक करेल तर शप्पथ!
प्रेम या नात्यात विश्वास अत्यंत महत्त्वाचा. जेव्हा तो विश्वास तुटतो तेव्हा ते नातंही संपत. काहीजण प्रेमाच्या या नात्यात विश्वासघात करतात अन् त्यांना नंतर पश्चाताप होतो पण तेव्हा वेळ निघुन गेलेली असते. एका तरुणीनं मात्र तिच्या प्रियकराला याची अशी काही शिक्षा दिली की तो अजुनही पश्चाताप करत आहे.
मिसोरीच्या (Missouri) केन्सास शहरात (Kansas City) राहणारी हेली पियर्स (Haley Pierce) हीची ही गोष्ट. तिचं वय २० वर्ष अन् ती तिच्या बॉयफ्रेंडसोबत २ वर्ष रिलेशनशिपमध्ये होती. जेव्हा तिला समजलं की तो तिला धोका देत आहे. तेव्हा तिनं त्याच्यासोबत ब्रेकअप केला. हेलीनं तिच्या बॉयफ्रेंडला इतर तरुणींसोबत चॅटवर फ्लर्ट करताना पकडलं होतं.
ब्रेकअपनंतर काही काळातच तिचा बॉयफ्रेंड परत आला. त्यानं तिची माफी मागितली. त्यानं तिच्याकडे दुसरी संधीही मागितली. तेव्हा तिनं एका अटीवर आपल्या प्रियकरासोबत पॅचअप केलं. ती अट अशी होती की तिच्याशी पुन्हा बोलायला तिला भेटायला ती त्याच्याकडुन पैसे घेणार होती. हॅली त्याच्यासोबत एकदा चॅट करण्यासाठी ३०० डॉलर्स घेते. याशिवाय भेटण्याचे चार्ज वेगळे आहेत. तिनं सांगितलं, की याच पैशातून ती आपल्या कॉलेजची फी भरते व आपल्या कुटुंबीयांचीही मदत करते.