मुलगी मुलगा बनून तरूणींसोबत करत होती रोमान्स, पोलखोल झाली तेव्हा सगळे झाले हैराण!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2023 03:27 PM2023-06-15T15:27:32+5:302023-06-15T15:29:18+5:30
सगळ्यांना ती मुलगाच वाटत होती. पण यादरम्यान तिच्या सवयी सुद्धा मुलांसारख्या झाल्या होत्या. ती मुलींसोबत रोमान्स करू लागली. पण जेव्हा याची पोलखोल झाली तेव्हा कोर्टाने अजब निर्णय दिला.
जगभरात सतत अशा काहीना काही घटना घडत असतात ज्या वाचून सगळेच हैराण होतात. अशीच एक अवाक् करणारी घटना समोर आली आहे. 21 वर्षीय एका तरूणीला अचानक तरूणांसारखं दिसण्याची आवड होऊ लागली. नंतर ती मुलांसारखी राहू लागली. त्यांच्यासारखीच कपडे घालू लागली होती. सगळ्यांना ती मुलगाच वाटत होती. पण यादरम्यान तिच्या सवयी सुद्धा मुलांसारख्या झाल्या होत्या. ती मुलींसोबत रोमान्स करू लागली. पण जेव्हा याची पोलखोल झाली तेव्हा कोर्टाने अजब निर्णय दिला.
ब्रिटनच्या 21 वर्षीय जॉर्जिया बिलहमला काही दिवसांआधी कोर्टात हजर करण्यात आलं. कारण तिच्याबाबत सुनावणी सुरू झाली तेव्हा असं काही समोर आलं की, सगळेच हैराण झाले. समोर आलं की, बिलहम स्वत:ला बर्मिंघमचा जॉर्ज पॅरी सांगत होती. ती एक पुरूष असल्याचं भासवत होती.
स्नॅपचॅटवर तिने एका 19 वर्षीय मुलीला गर्लफ्रेंड बनवलं. तिला फसवलं. इतकंच काय इतरही काही मुलींसोबत तिने असंच केलं. कोर्टात तिने आपली चूक कबूल केली. ती कोर्टात म्हणाली की, मला वाटलं की, माझ्या मैत्रिणींना याचा विश्वास आहे की, मी एक महिला आहे. पण गैरसमज झाला.
महिलेच्या आईने सांगितलं की, जॉर्ज बनल्यावर तिची मुलगी खूप आनंदी दिसत होती. तिच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती. पण जेव्हा हे समजलं की, तिचे अनेक मुलींसोबत संबंध आहे तेव्हा ती सुद्धा हैराण झाली.
तरूणीच्या आईने दावा केला की, ती अल्बानियाई गॅगस्टर्स जाळ्यात अडकली होती. 11 मे 2021 ला जॉर्जिया आपल्या आईसोबत कारने जात होती. तेव्हाच एक घटना घडली. पोलिसांनी तिला लायसन्स मागितलं. तेव्हा तिने तिचं खरं नाव सांगितलं. तेव्हाच तिची पोलखोल झाली.
कोर्टाने बिलहमचा हा दावा मान्य केलं की, ती नेहमीच एक टॉमबॉय राहिली आहे. तिला कधीच लिंग बदल करायचा नाहीये. पण तिला मुली आवडतात. त्यांच्यासोबत संबंध ठेवणं तिला आवडत होतं. तिला काही गुन्ह्यांमधून मुक्त केलं. पण एका तरूणीला किस करणं गुन्हा मानत तिला दोषी ठरवलं. आता 19 जुलैला तिला शिक्षा सुनावली जाणार आहे.