केवळ २१ वर्षाची असताना खरेदी केलं ८७ लाख रूपयांचं घर, तरूणीने सांगितली सेव्हिंगची खास ट्रिक

By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2021 03:08 PM2021-11-03T15:08:17+5:302021-11-03T15:29:09+5:30

बेकाने सांगितलं की, तिने २ बेडरूमचा फ्लॅट खरेदी केला. जो तिला कोरोना संकटामुळे ८७ लाख रूपयांमध्ये मिळत होता.

21 years old girl bought own house started savings from age of 16 money saving tricks | केवळ २१ वर्षाची असताना खरेदी केलं ८७ लाख रूपयांचं घर, तरूणीने सांगितली सेव्हिंगची खास ट्रिक

केवळ २१ वर्षाची असताना खरेदी केलं ८७ लाख रूपयांचं घर, तरूणीने सांगितली सेव्हिंगची खास ट्रिक

Next

ब्रिटनमध्ये राहणारी बेका थॉम्प्सनने २१ व्या वयात आपलं स्वत:चं घर घेण्याचं सीक्रेट सोशल मीडियावर शेअर केलं आहे. थॉम्प्सनने सांगितलं की, कशाप्रकारे आपल्या सेव्हिंग्समधून ८७ लाख रूपयांचं घर खरेदी केलं. तिने तिच्या सेव्हिंग ट्रिकबबात लोकांनाही माहिती दिली.

'मिरर यूके'च्या रिपोर्टनुसार बेका थॉम्प्सनने आपल्या टिकटॉक अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात तिने सांगितलं की, कशाप्रकारे १६ वर्षाची असताना तिने सेव्हिंग सुरू करत २१ व्या वर्षी स्वत:चं घर खरेदी केलं. बेका म्हणाली की, सुरूवातीला पगार कमी होता. प्रति तास ३०४ रूपये ती कमवत होती. पण पाच वर्ष लागोपाठ सेव्हिंग करत राहिल्याने ती एक घर घेण्यात यशस्वी ठरली.

सेव्हिंगची खास ट्रिक

बेकाने सांगितलं की, तिने २ बेडरूमचा फ्लॅट खरेदी केला. जो तिला कोरोना संकटामुळे ८७ लाख रूपयांमध्ये मिळत होता. आता तिने टिकटॉक फॉलोअर्ससोबत स्वत:ची सेव्हिंग ट्रिक शेअर केली आहे. आपल्या सेव्हिंग्सबाबत सांगताना ती म्हणाली की, ती जेव्हा कधी पैसे खर्च करत होती, तेव्हा तेवढेच पैसे आपल्या सेव्हिंग अकाउंटमध्ये टाकत होती. घर खरेदी करण्याचा विचार केल्यावर दर महिन्याला ८० हजार रूपये जमा करणे सुरू केले.

बचतीचा मूलमंत्र

बेका थॉम्प्सनने पुढे सांगितलं की, बचतीचा तिचा वेगळा मंत्रा आहे. जेवढे रूपये खर्च करणार तेवढेच सेव्ह करायचे. एका यूजरने विचारले की, इतक्या कमी इन्कममध्ये इतकं सेव्हिंग कसं केलं? तर बेका म्हणाली की, आई-वडील मला पैसे मागत नव्हते. त्यामुळे माझा सर्व पगार वाचत होता. माझे स्वत:चे खर्चही कमी आहेत. जसजशी सॅलरी वाढली, सेव्हिंग वाढली आणि शेवटी इतके पैसे जमा झाले की, मी एक घर खरेदी केलं. 
 

Read in English

Web Title: 21 years old girl bought own house started savings from age of 16 money saving tricks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.