'या' महिलेचं वय ओळखणं कठीण, मुलासोबतचे फोटो पाहून लोक पडले बुचकळ्यात!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2019 03:30 PM2019-08-06T15:30:49+5:302019-08-06T15:37:39+5:30

स्वत:ला तरूण आणि फिट ठेवणं प्रत्येकाचीच इच्छा असते. पण वाढत्या वयासोबत व्यक्तीचं सौंदर्यही हळूहळू कमी होऊ लागतं. मग ते पुरूष असो वा महिला.

22 year old man shared pictures of his young mother people understands his girlfriend mistakenly | 'या' महिलेचं वय ओळखणं कठीण, मुलासोबतचे फोटो पाहून लोक पडले बुचकळ्यात!

'या' महिलेचं वय ओळखणं कठीण, मुलासोबतचे फोटो पाहून लोक पडले बुचकळ्यात!

googlenewsNext

स्वत:ला तरूण आणि फिट ठेवणं प्रत्येकाचीच इच्छा असते. पण वाढत्या वयासोबत व्यक्तीचं सौंदर्यही हळूहळू कमी होऊ लागतं. मग ते पुरूष असो वा महिला. पण अमेरिकेतील लॉस एन्जेलिसमध्ये राहणाऱ्या एका महिलेचं वय जणू थांबलं आहे. या महिलेच्या वयाचा कुणी अंदाजच लावू शकत नाही. ती इतकी तरूण दिसते की, जेव्हा ती मुलासोबत घराबाहेर निघते तेव्हा लोक एकतर दोघांना गर्लफ्रेन्ड-बॉयफ्रेन्ड समजतात, नाही तर बहीण-भाऊ समजतात. 

२२ वर्षीय जोनाथन नूयेन नावाच्या तरूणासोबत असं नेहमीच होतं. जेव्हाही तो त्याच्या ४० वर्षीय आईसोबत घराबाहेर पडतो तेव्हा लोक त्यांना पाहून हैराण होतात. लोक त्यांना बॉयफ्रेन्ड-गर्लफ्रेन्ड किंवा भाऊ-बहीण समजून बसतात.

जोनाथनने या अनोख्या गोष्टीबाबत एक ऑस्ट्रेलियन फेसबुक ग्रुप एशियन ट्रेट्सवर लिहिलं आहे. त्याच्या या पोस्टवर ७ हजारपेक्षा जास्त लोकांनी कमेंट्स केल्या आहेत. एका यूजरने लिहिले की, 'तुझी आई खूप सुंदर आहे. पण मला वाटलं ती तुझी गर्लफ्रेन्ड आहे. मी विचार करत होतो की, किती सुंदर कपल आहे'.

लोकांनी जोनाथन आणि त्याच्या आईला सुंदर आणि तरूण दिसण्याचं गुपितही विचारलं आहे. त्यावर जोनाथन म्हणाला की. त्याची आई खूप फळं खाते आणि रोज व्यायाम करते. तसेच त्याने सांगितले की, कमी कार्बोहायड्रेट असलेले पदार्थ खावेत. चरबी असलेले पदार्थ आणि आधीच तयार करून ठेवलेले पदार्थ खाणे टाळावे.

जोनाथनने त्याच्या आईसोबतचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. तिथेही लोकांनी भरभरून कमेंट केल्या आहेत.

Web Title: 22 year old man shared pictures of his young mother people understands his girlfriend mistakenly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.