डॉक्टरांनी महिलेच्या डोळ्यातील 23 कॉन्टॅक्ट लेन्स काढल्या, पाहा, धक्कादायक व्हिडिओ!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2022 03:28 PM2022-10-14T15:28:21+5:302022-10-14T15:44:00+5:30

contact lenses : डॉक्टरांनी महिलेच्या डोळ्यावर शस्त्रक्रिया करून डोळ्यांमधून 23 कॉन्टॅक्ट लेन्स काढल्या आहेत.

23 contact lenses in womans eye doctor found after she did not remove it any day | डॉक्टरांनी महिलेच्या डोळ्यातील 23 कॉन्टॅक्ट लेन्स काढल्या, पाहा, धक्कादायक व्हिडिओ!

डॉक्टरांनी महिलेच्या डोळ्यातील 23 कॉन्टॅक्ट लेन्स काढल्या, पाहा, धक्कादायक व्हिडिओ!

googlenewsNext

डोळा हा शरीरातील सर्वात संवेदनशील भागांपैकी एक आहे. त्याचीही तशीच काळजी घेतली पाहिजे, अन्यथा पुढे खूप नुकसान होऊ शकते. मात्र एका महिलेच्या निष्काळजीपणामुळे तिच्या डोळ्यांना खूप इजा झाल्याची घटना समोर आली आहे. डॉक्टरांनी महिलेच्या डोळ्यावर शस्त्रक्रिया करून डोळ्यांमधून 23 कॉन्टॅक्ट लेन्स काढल्या आहेत.

दरम्यान, ही घटना अमेरिकेतील एका रुग्णालयातील आहे. येथील एका महिलेच्या डोळ्यात काही प्रॉब्लेम होता म्हणून तिने डोळ्यात कॉन्टॅक्ट लेन्स घालायला सुरुवात केली. एके दिवशी महिला कॉन्टॅक्ट लेन्स काढायला विसरली आणि तिला ही कॉन्टॅक्ट लेन्स पडली असे वाटले. यानंतर, तिने नवीन कॉन्टॅक्ट लेन्स विकत घेतली आणि डोळ्यात बसवली. आश्चर्याची बाब म्हणजे या महिलेसोबत अनेक दिवस हा प्रकार घडला आणि प्रत्येक वेळी ती नवीन कॉन्टॅक्ट लेन्स खरेदी करायची आणि डोळ्यात बसवायची.

जवळपास असे करत महिलेने 23 कॉन्टॅक्ट लेन्स विकत घेतल्या आणि डोळ्यात बसवल्या. या महिलेला असे वाटले की कॉन्टॅक्ट लेन्स स्वतःहून तिच्या डोळ्यातून पडत आहेत, परंतु तसे होत नव्हते. त्यानंतर एके दिवशी महिलेच्या डोळ्यात तीव्र वेदना होऊ लागल्या. महिला डॉक्टरांकडे पोहोचली तेव्हा तिने संपूर्ण हकीकत सांगितली. महिलेच्या डोळ्याची तपासणी केली असता सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

या महिलेच्या डोळ्यात 23 कॉन्टॅक्ट लेन्स अडकल्याचे डॉक्टरांना आढळले. महिला रोज रात्री कॉन्टॅक्ट लेन्स काढयचे विसवून जात होती आणि दुसऱ्या दिवशी नवीन लेन्स डोळ्यात घालत होती. या महिलेच्या डोळ्याच्या वरच्या भागात सर्व कॉन्टॅक्ट लेन्स जमा झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. डोळ्यातील लेन्स काढण्यासाठी त्यांनी अत्यंत लहान शस्त्रक्रियेचे साधन वापरले. सध्या या महिलेच्या डोळ्यातील सर्व कॉन्टॅक्ट लेन्स काढण्यात आल्या आहेत.

Web Title: 23 contact lenses in womans eye doctor found after she did not remove it any day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.