डीजेवाल्याच्या प्रेमात पडली, लग्नही केलं आणि आता कुटुंबिय देताहेत जीवे मारण्याची धमकी!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2023 05:34 PM2023-06-19T17:34:59+5:302023-06-19T17:35:24+5:30
23 वर्षीय प्रियंका मेघवाल गावात डीजे घेऊन आलेल्या डीजेवाले बाबूच्या प्रेमात पडली. दोघांनी नंबर शेअर केले आणि त्यांचं बोलणं सुरू झालं. दोघांनाही लग्न करायचं होतं.
कोण, कधी आणि कुठे कुणाच्या प्रेमात पडेल हे काहीच सांगत नाही आणि जेव्हा कुणी प्रेमात पडतात तेव्हा पुढे काय होईल याचा विचार करत नाहीत. त्यांना एक व्हायचं असतं. असंच काहीसं राजस्थानच्या झुंझुनूं जिल्ह्यात झालं. 23 वर्षीय प्रियंका मेघवाल गावात डीजे घेऊन आलेल्या डीजेवाले बाबूच्या प्रेमात पडली. दोघांनी नंबर शेअर केले आणि त्यांचं बोलणं सुरू झालं. दोघांनाही लग्न करायचं होतं. पण कुटुंबिय यासाठी तयार नव्हते. तरूणी तरूणासोबत पळून गेली आणि त्यांनी लग्नही केलं. पण आता कुटुंबिय त्यांना जीवे मारण्याची धमकी देत आहेत.
ही घटना चुरूपासून 15 किमी अंतरावरील झुंझुनूं परिसरातील आहे. कुटुंबियांच्या धमक्यांमुळे या कपलने आता पोलिसांकडे सुरक्षेची मागणी केली आहे. प्रियंका मेघवालने सांगितलं की, तीन वर्षाआधी तिची भेट धर्मेन्द्रसोबत झाली होती. धर्मेन्द्र खासोली गावात राहणारा आहे.
प्रियंका पदवीधर आहे तर धर्मेन्द्र 12वी पास आहे. धर्मेन्द्र तीन वर्षाआधी बिसाऊच्या एका लग्नात डीजे घेऊन आला होता. धर्मेन्द्रला बघताच ती त्याच्या प्रेमात पडली होती. त्यानंतर दोघेही फोनवर बोलत होते. तिला हे माहीत होतं की, धर्मेन्द्र 12वी पास आहे आणि डीजे वाजवतो. प्रियंकाने जेव्हा तिच्या नात्याबाबत कुटुंबियांना सांगितलं तेव्हा त्यांनी नकार दिला.
कुटुंबियांच्या विरोधानंतर 15 जून 2023 ला दोघेही घर सोडून पळून गेले आणि गाझियाबादमध्ये पोहोचले. इथे त्यांनी आर्य समाज मंदिरात लग्न केलं. आंतरजातीय विवाह असल्याने आता दोघांनाही जीवे मारण्याची धमकी दिली जात आहे. धमकी मिळाल्यानंतर दोघांनीही आता पोलिसांकडे मदतीची मागणी केली आहे.
प्रियंका आणि धर्मेंद्रने सांगितलं की, दोघांचंही एकमेकांवर प्रेम आहे. आता दोघांनी लग्नही केलं आहे. पण तरीही प्रियंकाचे कुटुंबिय हे नातं स्वीकारण्यास तयार नाहीत. ते सतत धमक्या देत आहेत. काका-भावांनी जीवे मारण्याची धमकी दिली आहे. अशात आम्हाला सुरक्षा हवी आहे.