२३ वर्षीय भारतीय तरूण मोठ्या कंपन्यांसाठी हॅकिंग करून वर्षाला कमवतोय ८८ लाख रूपये!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2019 04:25 PM2019-12-31T16:25:38+5:302019-12-31T16:28:19+5:30

तसा तर हॅकिंग करणे हा गंभीर गुन्हा आहे. पण Ethical Hacking करून तुम्ही लाखो रूपयांची कमाई करू शकता.

23 year old Indian ethical hacker who makes 88 lakhs a year by finding bugs | २३ वर्षीय भारतीय तरूण मोठ्या कंपन्यांसाठी हॅकिंग करून वर्षाला कमवतोय ८८ लाख रूपये!

२३ वर्षीय भारतीय तरूण मोठ्या कंपन्यांसाठी हॅकिंग करून वर्षाला कमवतोय ८८ लाख रूपये!

googlenewsNext

तसा तर हॅकिंग करणे हा गंभीर गुन्हा आहे. पण Ethical Hacking करून तुम्ही लाखो रूपयांची कमाई करू शकता. उत्तर भारतातील २३ वर्षीय शिवम वशिष्ठ हा तरूण सुद्धा हॅकिंग करून वर्षाला ८८ लाख रूपये कमाई करतो आहे. महत्त्वाची बाब म्हणजे त्याला आठवड्यातून केवळ १५ तासच काम करावं लागतं.

शिवम हा एक Ethical Hacker आहे. मोठमोठ्या वेबसाईट्स आणि Apps मधून बग शोधणं हे शिवमचं काम आहे. हे असे बग्स असतात ज्याने कंपनीला धोका असू शकतो किंवा त्यांना हॅक केलं जाऊ शकतं. हे काम शिवमने १९ व्या वर्षीच करिअर म्हणून निवडलं होतं. सध्या शिवम २३ वर्षांचा असून तो सॅन फ्रॅन्सिस्को येथील हॅकरवन कंपनीसोबत काम करतोय.

या कंपनीत त्याला वर्षाला १.२५ लाख डॉलर म्हणजे ८८.९१ लाख रूपये मिळतात. ही कंपनी Instagram, Twitter, Zomato, OnePlus सारख्या कंपन्यांना सर्व्हिस प्रोव्हाइड करते सायबर अटॅकपासून कंपन्यांना वाचवण्यासाठी शिवम आठवड्यातून १५ तास काम करतो. कधी कधी अनेक दिवस एकसारख कामही करावं लागतं.

पहिल्यांदा शिवमच्या घरच्यांना तो हॅकर असल्याचं समजलं होतं तेव्हा ते चिंतेत होते. पण नंतर त्यांना Ethical Hacking हे कायदेशीर असल्याचं समजल्यावर त्यांची चिंता दूर झाली. आता शिवम या माध्यमातून लाखोंची कमाई करतो आहे. 

मोठमोठ्या कंपन्या वेबसाईट किंवा अॅपमधील Bug शोधण्यासाठी एथिकल हॅकर्सना लाखो रूपये पगार देतात. अॅपलने सुद्धा Bug बाउंटी प्रोग्राम सुरू केला आहे. जिथे सिक्युरिटी रिसर्चर्स bug शोधण्यासाठी १ लाख डॉलर ते १० लाख डॉलर दरम्यान पैसे मिळतात. एथिकल हॅकिंगमध्ये भारताचा दुसरा क्रमांक आहे. पहिल्या क्रमांकावर अमेरिका आहे. 


Web Title: 23 year old Indian ethical hacker who makes 88 lakhs a year by finding bugs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.